अद्याक्षरावरून कविता ” गुरुपौर्णिमा “
गु……..गुरु माता पिता प्रथम
धरुनी त्यांचे चरण
स्मरावे त्यांना अमरण
ज्यांच्याकडून मिळते
आपणास शिक्षण
तेही आपले गुरुजन
करुनी त्यांचे स्मरण
धरावे त्यांचे ही चरण
रू…… रुणुझुणत्या पाखरा वाटते
स्वच्छंद वावरावे….
त्यासम गुरूंचे विचार
आपणही आचरावे….
पो……पोहताना हा जीवन प्रवास
आपल्यालाही लागते गुरुची आस
कारण तेच शिकवत असतात
जीवनामध्ये जगायला खास
र्णि……. निर्विकारपणे छाया धरतात
गुरु आपल्यावर
आपणही होऊ शकतो
आदर्श गुरुप्रमाणे
चांगले विचार जपल्यावर
मा…….. माहित आहे गुरुशिवाय
नाही ज्ञान
म्हणून सतत करावे
त्यांचे ध्यान
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु
गुरुर्देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह
तस्मै श्री गुरवे नमः
सौ निर्मला कुंभार
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.