कांद्याचे पीक हे जवळपास ४५ दिवसाचे झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजना…
रोग तसेच किडीच्या तीव्रतेनुसार प्रतिबंधाकरिता कीटकनाशक आणि बुरशीनाशक मिश्रण कार्बोसल्फान १ मिली प्रतिलिटर अधिक प्रोपिकोनाजोल १ ग्राम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. तसेच खुरपणी करून उर्वरित नत्राची तीस किलो प्रती हेक्टर मात्रा पिकास द्यावी.
सूक्ष्म पोषक तत्वे पिकाच्या वाढी साठी तसेच उत्तम पीक उत्पादना साठी गरजेची असतात कांदा पिकामध्ये सूक्ष्म पोषक तत्वांचे नियोजन करण्या करिता सूक्ष्म पोषण तत्व मिश्रणाची ७ मिली प्रति लिटर याप्रमाणात पुर्नलागवडीच्या ४५ व्या ६० व्या आणि ७५ व्या दिवसानंतर फवारणी करावी.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.