बिडंबन = काठीन घोंगडं
ईडीची नोटीस राहु द्या की रं
मलाबी सत्तेत येऊ द्या की
ईडीची नोटीस राहु द्या की रं
मलाबी सत्तेत येऊ द्या की
घोळ आलाय डोळ्यावर
नाव गेलंय दिल्लीवर
खेळ चाले बंगल्यावर
येतो सोडुनी मतदार
खोके उधळुन गावा म्होरं
कसला विसावा घटकाभर
ऐसी करणी गा सुंदर
गेली करपुनी भाकर
किती करावी यरझार
पाय फिरत्याती गरगर
कोंबडीला कापुन खावू द्या
अरे कोंबडी कापुन खावू द्या की रं
ईडीची नोटीस राहुद्या की रं
मलाबी सत्तेत येऊ द्या की रं
पळ पळून म्या चौकुर
वळती करुन अाणल्याती पोरं
खंड्या नेता ह्यो हाय माजुर
घेतो शपथ जातो दुर
सत्ता सुंदरी लय चातूर
धन दिलंया भरपुर.
नेतं पाण्यावर निहु द्या
अरं नेतं पाण्यावर नीहुद्या की रं
ईडीची नोटीस राहुद्या की रं
मलाबी सत्तेत येऊ द्या की रं
मी पक्षाचा हाय चाकुर
पैका मोजुन होतोय चुर
नेता माझा लय मगरुर
ईडी करतीया कुरकुर
पायी नगपुरी खेटुर
पॅन्ट फाटतीया टुरटुर.
बोका खोक्यावर जाऊ द्या
अरे बोका खोक्यावर जाऊद्या
ईडीची नोटीस राहु द्या की रं
मलाबी सत्तेत येऊ द्या की रं
साधु सत्तार केसकर
देव बामणाचा बर्षावर
कोल्हापुरीचा चंदर
वरळी मुंबईचा बिलींदर
बार शेजारी आपली घरं
देशी मारुन तरबित्तर
अरं तुमच्यात सामील होऊद्या
अरं तुमच्यात सामील होऊ द्या की रं
ईडीची नोटीस राहु द्या की रं
मलाबी सत्तेत येऊ द्या की रं
कवी – शिवाजी सातपुते ९०७५७०२७८९
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.