December 12, 2024
President's Medal for Distinguished Service to Four Police Officers of Maharashtra
Home » महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक

१८ पोलीस जवानांना शौर्य पदक तर ४० पोलीस जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक.
गृहरक्षक व नागरी संरक्षणासाठी सात पदके तर सुधारात्मक सेवेसाठी नऊ पदके; अग्निशमन सेवेसाठी सहा अधिकाऱ्यांना गुणवत्ता सेवेसाठी पदक जाहीर

प्रजासत्ताक दिन २०२४ निमित्त पोलीसअग्निशमन सेवागृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेतील ११३२ जवानांना शौर्य/सेवा पदके जाहीर

नवी दिल्ली : भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण दल आणि सुधार सेवेतील एकूण 1132 कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. या यादीमध्ये महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, 18 पोलिस अधिकाऱ्यांना शौर्य पदके आणि गुणवत्ता सेवेअंतर्गत 40 पदके पोलीस सेवेसाठी, सहा पदके अग्निशमन सेवेसाठी, सात पदके गृहरक्षक आणि नागरी संरक्षण, तर सुधारात्मक सेवेसाठी नऊ कारागृह अधिकाऱ्यांना पदके देऊन गौरविण्यात येणार आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस पदकांची यादी जाहीर झाली. यात महाराष्ट्रातील एकूण 78 पोलिस अधिकाऱ्यांना तर सहा अग्निशमन विभागातील सहा अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या यादीत चार श्रेणींमध्ये पुरस्काराची घोषणा झाली आहे. यात, दोन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना प्रतिष्ठित सेवेकरिता ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ (पीएमजी), 275 पोलीस अधिकाऱ्यांना ‘पोलीस शौर्य पदक’ (जीएम) तर विशिष्ट सेवेकरिता 102 ‘राष्ट्रपती पदक’  (पीएसएम) तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 753 पदके जाहीर झाली असून, यामध्ये महाराष्ट्र राज्याला एकूण 84 पदके जाहीर झाली आहेत. यामध्ये सहा अग्निशमन सेवेसाठी सहा पदकांचाही समावेश आहे.

यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या पदकांच्या नुकत्याच झालेल्या पुनर्रचनेनंतर, प्रजासत्ताक दिन 2024 निमित्त पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवा यांच्या एकूण 1132 कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके प्रदान करण्यात आली आहेत.

विविध पदकांचा सन्मान करण्यासाठीची संपूर्ण पदक व्यवस्था तर्कसंगत करण्यासह त्यात  परिवर्तन करण्याच्या दृष्टीने गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने अनेक पावले उचलली असल्याने, या अनुषंगाने, सोळा शौर्य/सेवा पदके (पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक दल आणि नागरी संरक्षण आणि सुधार सेवेसाठी) तर्कसंगत करण्यात आली असून चार पदकांमध्ये राष्ट्रपतींचे शौर्य पदक (PMG)

शौर्य पदक (GM), विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM) आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM)

या श्रेणींमध्ये विलीन करण्यात आली  आहेत.

महाराष्ट्रातील पदकप्राप्त अधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे :

विशिष्ट सेवा (PSM) प्रजासत्ताक दिन 2024 साठी राष्ट्रपती पदक 

  1. श्री. निकेत रमेशकुमार कौशिक, अतिरिक्त पोलीस महासंचालक.
  2. श्री. मधुकर पांडे, पोलिस आयुक्त, मीरा भाईंदर वसई विरार.
  3. श्री. दिलीप रघुनाथ सावंत, विशेष पोलीस महानिरीक्षक .
  4. श्री. मधुकर शिवाजी कड, पोलीस निरीक्षक.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शौर्य पदक (GM) पुरस्कारासाठी पुरस्‍कारार्थींची यादी- 2024

  1. श्री. संकेत सतीश गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी.
  2. श्री. कमलेश निखेल नैताम, नाईक पोलीस हवालदार
  3. श्री. शंकर पोचम बचलवार,नाईक पोलीस हवालदार
  4. श्री. मुन्शी मासा मडावी ,नाईक पोलीस हवालदार
  5. श्री. सूरज देविदास चौधरी, पोलीस हवालदार
  6. श्री. सोमय विनायक मुंडे, भारतीय पोलीस सेवा (IPS) अतिरिक्त पोलिस अधीक्षक (SP)
  7. श्री. मोहन लच्छू उसेंडी, हेडकॉन्सटेबल
  8. श्री. देवेंद्र पुरुषोत्तम आत्राम, नाईक पोलीस हवालदार
  9. श्री. संजय वट्टे वाचामी, नाईक पोलीस हवालदार
  10. श्री. विनोद मोतीराम मडावी, नाईक पोलीस हवालदार
  11. श्री. गुरुदेव महारुराम धुर्वे, नाईक पोलीस हवालदार
  12. श्री. दुर्गेश देविदास मेश्राम, नाईक पोलीस हवालदार
  13. श्री. हिराजी पितांबर नेवारे, पोलीस हवालदार
  14. श्री. ज्योतिराम बापू वेलाडी, पोलीस हवालदार
  15. श्री. माधव कोरके मडावी, नाईक पोलीस हवालदार
  16. श्री. जीवन बुधाजी नरोटे, नाईक पोलीस हवालदार
  17. श्री. विजय बाबूराव वड्डेटवार, पोलीस हवालदार
  18. श्री. कैलास श्रावण गेडाम, पोलीस हवालदार

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (MSM) पोलीस सेवा

  1. श्री. सत्य नारायण इंद्रजराम चौधरी, सह पोलीस आयुक्त (L&O).
  2. श्री. संजय भीमराव पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त.
  3. श्री. दीपक श्रीमंत निकम, सहाय्यक पोलीस आयुक्त.
  4. श्रीमती राधिका सुनील फडके, पोलीस उपअधीक्षक (गृह).
  5. श्री. प्रदीप रामचंद्र वारंग, पोलीस निरीक्षक.
  6. श्री. सुनील रामदास लाहिगुडे, पोलीस उपअधीक्षक.
  7. श्री. विजयकुमार नरसिंगराव ठाकूरवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी .
  8. श्री. माणिक विठ्ठलराव बेद्रे, पोलीस निरीक्षक.
  9. श्री. योगेश मारुती चव्हाण, पोलीस निरीक्षक.
  10. श्री. संजय राजाराम मोहिते, पोलीस निरीक्षक.
  11. श्री. सुरेश दिनकर कदम, पोलीस निरीक्षक.
  12. श्री. रणवीर प्रकाश बायस, पोलीस निरीक्षक.
  13. श्री. वसंतराव दादासो बाबर, पोलीस निरीक्षक.
  14. श्री. जयंत वासुदेवराव राऊत, पोलीस निरीक्षक.
  15. श्री. महेशकुमार नवलसिंग ठाकूर, पोलीस निरीक्षक.
  16. श्री. सुनील भिवाजी दोरगे, पोलीस निरीक्षक.
  17. श्री. सचिन राजाराम गावस, पोलीस निरीक्षक.
  18. श्री. मिलिंद यशवंत बुचके, पोलीस बिनतारी निरिक्षक.
  19. श्री. सुशीलकुमार सुरेशराव झोडगेकर, पोलीस उपनिरीक्षक.
  20. श्री. हरिश्चंद्र विठोबा जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक.
  21. श्री. सुहास सखाराम मिसाळ, पोलीस उपनिरीक्षक.
  22. श्री. किशोर शांताराम नलावडे, पोलीस उपनिरीक्षक.
  23. श्री. विनय राजाराम देवरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.
  24. श्री. राजेंद्र श्रीरंग शिरतोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी.
  25. श्री. उत्तम राजाराम सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक.
  26. श्री. किशोर राजाराम सुर्वे, पोलीस निरीक्षक.
  27. श्री. प्रकाश महादेव परब, पोलीस उपनिरीक्षक.
  28. श्री. सदाशिव आत्माराम साटम, पोलीस उपनिरीक्षक.
  29. श्री. अशोक लक्ष्मण काकड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.
  30. श्री. प्रमोद रामभाऊ आहेर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.
  31. श्री. राजेंद्रभाऊ घाडीगावकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.
  32. श्री. दिलीप शिवाजी तडाखे, पोलीस निरीक्षक.
  33. श्री. नंदू रामभाऊ उगले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.
  34. श्री. नितीन विश्वनाथ संधान, पोलीस हेड कॉन्स्टेबल.
  35. श्री. संदीप अर्जुन हिवाळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.
  36. श्री. सुनील हिंदुराव देटके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.
  37. श्री. शाबासखान दिलावरखान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.
  38. श्रीमती सीमा अप्पा डोंगरीटोट, महिला हेड  कॉन्स्टेबल.
  39. श्री. विजय भास्कर पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल.
  40. श्री. देवाजी कोट्टूजी कोवासे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक.

अग्निशमन सेवा

  1. श्री. अनिल वसंत परब, उपमुख्य अग्निशमन अधिकारी.
  2. श्री. हरिश्चंद्र रघु शेट्टी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी.
  3. श्री. देवेंद्र शिवाजी पाटील, विभागीय अग्निशमन अधिकारी .
  4. श्री. राजाराम निवृत्ती कुदळे, उप अधिकारी.
  5. श्री. किशोर जयराम म्हात्रे, लिडिंग फायरमन, महाराष्ट्र.
  6. श्री. मुरलीधर अनाजी आंधळे, लिडिंग फायरमन, महाराष्ट्र.

गृहरक्षक आणि नागरी संरक्षण

  1. डॉ. रश्मी प्रकाशचंद्र करंदीकर, वरिष्ठ कर्मचारी अधिकारी (प्रशासन आणि धोरण)
  2. श्री. संजय यशवंत जाधव, नागरी संरक्षण अतिरिक्त नियंत्रक, बृहन्मुंबई
  3. श्रीमती राजेश्वरी गंगाधर कोरी, कमांडंट, वरिष्ठ कर्मचारी अधिकारी (प्रशिक्षण)
  4. श्री. रवींद्र प्रभाकर चरडे, प्लाटून कमांडर
  5. श्री. अरुण तेजराव परिहर, केंद्र कमांडर
  6. श्री. अमित शंकरराव तिमांडे, होम गार्ड सार्जंट
  7. श्री. योगेश एकनाथ जाधव, होम गार्ड

सुधारात्मक सेवा

  1. श्री. रुक्माजी भुमन्ना नरोड, जेलर ग्रुप I
  2. श्री. सुनील यशवंत पाटील, जेलर ग्रुप I
  3. श्री. नामदेव संभाजी भोसले, हवालदार
  4. श्री. संतोष रामनाथ जगदाळे, हवालदार
  5. श्री. नवनाथ सोपान भोसले, हवालदार
  6. श्री. बळिराम पर्वत पाटील, सुभेदार
  7. श्री. सतीश बापूराव गुंगे, सुभेदार
  8. श्री. सूर्यकांत पांडुरंग पाटील, हवालदार
  9. श्री. विठ्ठल श्रीराम उगले, हवालदार

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading