द्वितीय आंतरराष्ट्रीय अलक संमेलन
रेणुका आर्टस् आयोजित द्वितीय आंतरराष्ट्रीय अलक (अती लघुकथा) संमेलन गुगल मीटवर पार पडलं. या संमेलनात देशविदेशातून जवळपास ३० अलककारांनी सहभाग नोंदवला. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी रेडियो पुणेरी आवाजचे आर जे प्राध्यापक जगदीश संसारे तर होरा पंडित मयुरेश देशपांडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
अलक साहित्य प्रकारची ताकद ओळखून सर्वांनी विषय निवडावेत, असे संमेलनाचे प्रमुख पाहुणे मयुरेश देशपांडे म्हणाले. भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथांवर अधिकाधिक अलक लिहिल्या जाव्यात जेणेकरून पुढील पिढ्यांना सैन्यात जाण्याची इच्छा निर्माण होईल, असेही ते पुढे म्हणाले.
संमेलनाचे अध्यक्ष आर जे जगदीश संसारे यांनी अलकचा प्रसार करण्यात अलक संमेलनाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. अलंकचे विविध उदाहरणं सादर करून त्यांनी उपस्थित अलककारांना अलक लिहिण्याबद्दल बहुमूल्य मार्गदर्शन केले. अलककार हा सन्माननीय शब्द श्री.संसारे यांनीच प्रचलित केला आहे. संमेलनात सहभागी सर्व अलककारांचे त्यांनी अभिनंदन केले तर काही उल्लेखनीय अलक व अलंककारांचं कौतुकही केले. संमेलनात जगाच्या कानाकोपऱ्यातून अलककार सहभागी झाल्याने हे संमेलन आंतरराष्ट्रीय असल्याचेदेखील त्यांनी जाहीर केले.
अलक हा आव्हानात्मक साहित्य प्रकार समर्थपणे हाताळणाऱ्या अलककारांसाठी एक हक्कांचं व्यासपीठ मिळावं व नवोदित अलककारांना मार्गदर्शन मिळावं याकरीता अलक संमेलनाचं आयोजन केल्याचं रेणुका आर्टस् प्रमुख व अलक संमेलनाच्या आयोजिका आसावरी इंगळे यांनी प्रास्ताविकमध्ये सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा टोपे (दुर्ग – छत्तीसगढ) यांनी केले, भारती महाजन रायबागकर (चेन्नई) यांनी स्वरचित सरस्वती वंदना सादर केली तर अलका कोठावदे (नाशिक) यांनी मान्यवरांचे आभासी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी भारती महाजन रायबागकर (चेन्नई), अलका कोठावदे (नाशिक) व विश्र्वेश देशपांडे (छत्रपती संभाजी नगर) यांनी संमेलनाबद्दल त्यांचे मनोगत व्यक्त केले. पूर्णिमा देसाई (गोवा) यांनी आभार प्रदर्शन केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.