सांगली – जिल्ह्यातील कणेगाव येथील कै. विकास पाटील सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने सन २०१८ पासून जेष्ठ नेते भिमराव आ. पाटील (अण्णा) यांच्या प्रेरणेने राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. यंदाच्यावर्षी साहित्याच्या गद्य आणि पद्य प्रकारांमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत. गद्यामध्ये कथा, कादंबरी, आत्मचरित्र, नाटक, ललित लेखन, समीक्षा, शिक्षण विषयक, बाल साहित्य आदी साहित्य प्रकारांतील दोन साहित्यकृतींना पुरस्कार तर पद्यामध्ये एक पुरस्कार दिला जाणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सुरेश आडके यांनी दिली आहे.
पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ असे असून १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यकृतींचा विचार या पुरस्कारासाठी करण्यात येईल. तरी पुरस्काराकरिता साहित्यकृतींच्या दोन प्रती परिचयासह २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पोस्टानेच पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
साहित्यकृती पाठवण्याचा पत्ता-
प्रा. सुरेश आडके, अध्यक्ष,
कै. विकास पाटील सामाजिक प्रतिष्ठान, कणेगाव,
ता. वाळवा, जि.सांगली. पिन कोड – ४१५४११,
मो. ९९२३०३९९५६.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
पदलालची…