तुकोबांशी जोडून घेताना.. जन्म कधी ? मृत्यू कधी ? मृत्यू .. खून की वैकुंठगमन ? किती वर्ष अडकायचे या प्रश्नातच आपण ? दरवर्षी हीच चर्चा.. हाच वाद.. तिथी की तारीख.? जयंती की पुण्यतिथी.. की स्मृतिदिन किती शब्दांच्या जंजाळातच अडकायचे आपण.? अभिवादन करायचेय तर ते रोजच करूयात.. खरा तुकोबा समजून घेऊयात त्यांचा विचार सर्वांपर्यंत पोहोचवूयात बैठका होतात घरोघरी.. गावोगावी व्यक्त करतो चिंता, बहुजनांना अडकवल्याची.. तेव्हा करूया आत्मचिंतन जरा आता तुकोबांचे नाव घेतो फक्त, पण कमी पडतोय आपणच कुठेतरी वर्षानुवर्षे ‘त्यांनी’ काय केले या प्रश्नातच..!.. टाकू एक पाऊल पुढे करूया विचार मनी तुकोबा तर काळाबरोबर आहेतच आपल्यासोबत पोहोचवू त्यांना घरोघरी.. इतिहास समजून घेताना नका करू वर्तमानाकडे दुर्लक्ष नका अडकू त्याच त्या प्रश्नात जोडून घेऊ तुकोबाला आपण.. विचार त्यांचा समजून घेऊ आचरणात आणूया करूया विकास आपला आपणच आता मागे वळून नको पाहूया..!!! अॅड. शैलजा मोळक 9823627244
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.