आठवडी पिक सल्ला (केळी आणि संत्रा-मोसंबी-लिंबू ) 🍌🍌🍊🍋
केळी पिक सल्ला खत व्यवस्थापन
👉🏽मृगबाग : लागवडीनंतर १६५ दिवसांनी प्रतिझाड ८२ ग्रॅम युरिया व ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
लागवडीनंतर २१० दिवसांनी प्रतिझाड ३६ ग्रॅम युरिया द्यावा.
नवीन कांदेबाग :
पहिला हप्ता लागवडीनंतर ३० दिवसांच्या आत द्यावा (प्रतिझाड ८२ ग्रॅम युरिया व ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पॉटेश).
दुसरा हप्ता लागवडीनंतर ७५ दिवसांनी द्यावा (प्रतिझाड ८२ ग्रॅम युरिया).
👉🏽ठिबक सिंचनाद्वारे खत देताना,
नवीन कांदे बाग : प्रति हजार झाडासाठी लागवडीपासून १ ते १६ आठवड्यांपर्यंत ४.५ किलो युरिया, ६.५ किलो मोनोअमोनियम फॉस्फेट व ३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
मृग बाग : लागवडीपासून १७ ते २८ आठवड्यांपर्यंत १३ किलो युरिया व ८.५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
👉🏽निंबोळी ढेप
नवीन कांदेबागेस : प्रतिझाड २०० ग्रॅम
मृग बागेस : प्रति झाड ५०० ग्रॅम
संत्रा-मोसंबी-लिंबू पिक सल्ला 🍋🍊
पाणी व्यवस्थापन
🍊ठिबक सिंचन संच असल्यास त्याच्या नळ्या पसरून घ्याव्यात. या दिवसांमध्ये संत्रा व मोसंबीच्या एक वर्षाच्या झाडाला प्रति दिन ८ लिटर, चार वर्षांच्या झाडाला ३६ लिटर, आठ वर्षांच्या झाडाला ८५ लिटर आणि दहा वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या झाडाला १०५ लिटर पाणी द्यावे.
🍋संत्रा, मोसंबीच्या तुलनेमध्ये लिंबूच्या झाडांची पाण्याची गरज कमी असते. एक वर्षाच्या झाडाला प्रति दिन ४ लिटर, चार वर्षांच्या झाडाला १५ लिटर, आठ वर्षांच्या झाडाला ५३ लिटर पाणी आणि दहा वर्षे व त्यावरील झाडाला ८८ लिटर पाणी द्यावे. ठिबक सिंचनाची सुविधा नसल्यास दुहेरी रींग पद्धतीने सिंचनासाठी आळे करावे. पाटपाणी बागेमध्ये देऊ नये.
🌳जमिनीची मशागत व निंदणी करून घ्यावी.
(सौजन्य – कृषक पीक सल्ला)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.