October 9, 2024
biological method to control carrot grass article by Krushisamrpan
Home » Privacy Policy » जैविक पद्धतीने गाजर गवताचा असा करा नायनाट
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जैविक पद्धतीने गाजर गवताचा असा करा नायनाट

गाजरगवत हे शेतासह शहरामध्येही मोठ्या प्रमाणात आढळते. विशेषतः पडीक जमिनीत किंवा रस्त्याच्या बाजूला याचा मोठा प्रादुर्भाव दिसून येतो. शेतामध्ये याचा प्रादुर्भाव झाल्यास साहजिकच याचा पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो. हे विचारात घेऊन याचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. गाजर गवताचे जैविक पद्धतीने नियंत्रण करणे शक्य आहे. झायगोग्रामा बायकोलरॅटा या भुंग्याच्या मदतीने गाजर गवताचा नायनाट करणे शक्य आहे. या संदर्भातील हा लेख

🌳 सौजन्य – कृषिसमर्पण🌳

🐞 झायगोग्रामा बायकोलरॅटा भुंगे… 🐞

झायगोग्रामा बायकोलरॅटा भुंग्याचा जीवनक्रम :

या किडीचे प्रौढ भुंगे मळकट पांढरे असुन त्यावर काळसर रंगाच्या सरळ आणि नागमोडी रेषा असतात. मादी भुंगे अलग अलग अथवा गुच्छात पानाच्या मागील बाजुवर अंडी घालतात. अंडयांचा रंग फिकट असुन अंडयातुन अळ्या बाहेर पडण्याच्या वेळी त्या लालसर होतात. अंडी अवस्थेचा कालावधी 4 ते 6 दिवसाचा असुन अंड्यातुन बाहेर निघालेल्या अळ्या गाजर गवताच्या वरील भागातील पाने खातात. तरुण अळया झाडाची वाढ व फुले येण्याचे थांबवितात. अळीच्या 4 अवस्था असुन पुर्ण वाढलेल्या अळया रंगाने पिवळया पडतात. अळी अवस्था 10 ते 11 दिवसांची असते, कोषावस्था 9 – 10 दिवसांनी असुन कोषावस्थेत मातीत गेलेले भुंगे जमिनीतुन निघुन गाजर गवताच्या पानावर उपजिवीका करतात. पावसाळयात जुन ते ऑक्टोंबर पर्यंत हे भुंगे गाजर गवत फस्त करतात. नोव्हेंबर नंतर हे भुंगे जमिनीत 7 ते 8 महिने दडुन बसतात आणि पुढील वर्षी पावसाळाच्या सुरुवातीच्या पावसानंतर जमिनीतुन निघुन गाजरगवताचा नाश करण्यास सुरुवात करतात. हे भुंगे एखाद्या ठिकाणी स्थिर झाले की पुढच्या वर्षी पुन्हा पुन्हा भुंगे सोडण्याची गरज पडत नाही.

भुंगे कोठे व किती सोडावेत :

शेतात प्रति हेक्टरी 500 भुंगे सोडावेत. मनुष्यप्राण्याचा अडथळा / शिरकाव नाही, अशा जागी भुंगे सोडण्यास योग्य. प्रभावी नियंत्रण रेल्वे व राज्य रस्त्याच्या दोन्ही बाजुने पडिक जमिनीत, बसस्थानका जवळीत मोकळया जागेत त्वरीत मिळते.

नव्या जागी भुंगे सोडण्यासाठी कसे पाठवावे :

भरपुर भुंगे असलेल्या गवतावरील 500 – 1000 भुंगे 10 – 15 सें.मी. उंच प्लॅस्टीकच्या बाटलीत टोपणास जाळी असलेले झाकण लावावे. बाटलीत गाजर गवताचा पाला खाद्य म्हणुन टाकावा.

भुंग्याचा इतर पिकाना उपद्रव :

बंगळूरुच्या जैविक किड नियंत्रण संचालनालयाच्या चाचणी नुसार इतर पिकांना सुरक्षित आहेत. भुंगे व अळ्या फक्त गाजरगवतच खातात. गाजरगवत उपलब्ध नसल्यास भुंगे जमीनीत सुप्तावस्थेत जातात.

भुंग्याचा मानवाला त्रास :

झायगोग्रामा भुंग्याचा मनुष्य व प्राणीमात्राला त्रास नाही. भुंगे दिवसा कार्यरत असल्यामुळे जमा करणे योग्य नाही. सकाळी अथवा सायंकाळी भुंगे जमा करण्यास योग्य काळ आहे.

भुंग्याचे प्रयोगशाळेत अथवा शेतावर गुणन :

प्रयोगशाळेत प्‍लॅस्टीकच्या 6 x 9 इंच आकाराच्या डब्यात. शेतात 10 x 10 फुट अथवा 10 x 15 फुट आकाराच्या मच्छरदाणीत कृत्रिमरित्या गाजर गवतावर भुंग्याने गुणन करतात.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading