October 16, 2024
gulvel-medicinal-plant-not-posions-ayush-parlment says
Home » Privacy Policy » गुळवेल विषारी नसल्याचे आयुष मंत्रालयाचे स्पष्टीकरण
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गुळवेल विषारी नसल्याचे आयुष मंत्रालयाचे स्पष्टीकरण

गुळवेल (गुडुची) सुरक्षित आहे आणि कोणतेही विषारी परिणाम करत नाही असे स्पष्टीकरण आयुष मंत्रालयाने केले आहे.

गुळवेल या वनस्पतीचा (गिलॉय/गुडुची) यकृतावर विपरीत परिणाम होतो असे चुकीचे विधान माध्यमांतील काही विभागांनी केले आहे. गुळवेल ही वनस्पती (गिलॉय/गुड्डुची : टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) सुरक्षित आहे आणि उपलब्ध माहितीनुसार, गुळवेल कोणताही विषारी परीणाम करत नाही, याचा आयुष मंत्रालयाने पुनरूच्चार केला आहे.

औषधाची योग्य मात्रा हा महत्त्वाचा घटक

आयुर्वेदामध्ये गुळवेल उत्तम कायाकल्प करणारी औषधी वनस्पती आहे, असे म्हटले आहे. गुळवेलीच्या  काढ्याच्या नजीकच्या अभ्यासात असे दिसून आले आहे, की याचा अर्क कोणताही तीव्र विपरीत परीणाम निर्माण करत नाही.  तथापि, औषधाची सुरक्षितता ते कसे वापरली जाते, यावर अवलंबून असते. औषधाची मात्रा हा एक महत्त्वाचा घटक आहे, जो विशिष्ट औषधाची सुरक्षितता निर्धारित करतो. 

इच्छित परिणाम मिळविण्यासाठी इष्टतम मात्रा गरजेची

एका अभ्यासात असे दिसून आले की, गुळवेलीच्या पावडरची कमी ताकदीची संकेंद्रीकरणाची (काॅन्सन्ट्रेशन) मात्रा दिल्यास (पातळ काढ्यात) फ्रूट फ्लाय अर्थात फळ माशी  (ड्रोसोफिला मेलानोगास्टर) चे आयुष्य वाढते. तसेच, उच्च संकेंद्रीकरण ( हाय काॅन्सन्ट्रेशन) मात्रा दिल्यास माशीचे आयुष्य हळूहळू कमी होते. यामुळे हे स्पष्टपणे सिध्द होते, की इच्छित परिणाम मिळविण्यासाठी इष्टतम मात्रा दिली गेली पाहिजे. यावरून असा निष्कर्ष काढला जातो की या औषधी वनस्पतीचा परिणाम प्राप्त होण्यासाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेल्या डॉक्टरांनी सांगितलेल्या योग्य मात्रेतच ही औषधी वनस्पती वापरणे आवश्यक आहे.

गुळवेलीचे औषधी उपयोग

उपचारांची विस्तृत श्रेणी आणि मुबलक घटकांसह, गुळवेल ही औषधी वनस्पती, वनस्पती औषधी स्त्रोतांमधील एक मोठा खजिना आहे. विविध विकारांचा सामना करण्यासाठी गुळवेलीचे औषधी उपयोग आणि त्याचा वापर प्राणवायू वर्धक (अँटी-ऑक्सिडंट), रक्तशर्करा विरोधी (अँटी-हायपरग्लायसेमिक), रक्तमेद विरोधी (अँटी-हायपरलिपिडेमिक), यकृत संरक्षक (हेपॅटोप्रोटेक्टिव्ह), हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी संरक्षक (कार्डिओ व्हास्क्युलर प्रोटेक्टीव्ह), मज्जारज्जू संरक्षक  (न्यूरोप्रोटेक्टिव्ह), अस्थिसंरक्षक (ऑस्टियोप्रोटेक्टिव्ह), क्ष किरण संरक्षक (रेडिओप्रोटेक्टिव्ह), अवसाद विरोधी (अँटी-ॲंक्झायटी), सहनशील (ॲडॅप्टोजेनिक), वेदना शामक (अँनाल्जेसिक), दाहशामक  (अँटी-इन्फ्लमेटरी) तापरोधक (ॲंटी-पायरेटीक), आंत्रव्रणविरोधी (अँटी-अल्सर), आणि अतिसारविरोधी, विरोधी (अँटी-डायरल), सूक्ष्मजीव विरोधी (अँटी-मायक्रोबियल) आणि कर्करोग विरोधी (अँटी-कॅन्सर) चांगल्या प्रकारे स्थापित केले गेले आहेत.

मानवी आयुर्मान वाढण्यास मदत

विविध चयापचय विकारांवर उपचार करण्यासाठी त्याच्या आरोग्य लाभांवर आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या क्षमतेवर विशेष लक्ष केंद्रित केले गेले आहे. हे चयापचय, अंतःस्राव आणि इतर अनेक आजार सुधारण्यासाठी उपचाराचा एक प्रमुख घटक म्हणून वापरले जाते, ज्यामुळे मानवी आयुर्मान वाढण्यास मदत होते. पारंपारिक औषध प्रणालींमध्ये मोठ्या प्रमाणात उपचारात्मक अनुप्रयोगांसाठी ही एक लोकप्रिय औषधी वनस्पती आहे आणि ती कोविड-19 च्या व्यवस्थापनात वापरली जाते. एकूण आरोग्य विषयक लाभ लक्षात घेता, ही औषधी वनस्पती विषारी असल्याचा दावा केला जाऊ शकत नाही.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading