October 4, 2023
book-review-of-ramkathamala
Home » रामकथा ब्रह्मांड भेदूनी गेली
काय चाललयं अवतीभवती

रामकथा ब्रह्मांड भेदूनी गेली

प्रस्तुत रामकथामालेत दिग्विजयाचा अप्रतिम परिचय सहजपणे करून देण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.

डॉ. सच्चिदानंद शेवडे

सहस्रावधी वर्षे रामकथा ही जनसामान्यांच्या मनाला भुरळ घालीत आहे, ती त्यातील आदर्शांमुळे होय ! ब्रह्मदेवांनी दिलेल्या आशीर्वादानुसार ही कथा आज विश्वभरात जाऊन पोचली आहे. प्रस्तुत रामकथामालेत याच दिग्विजयाचा अप्रतिम परिचय सहजपणे करून देण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.

वेदातील रामकथा, वाल्मिकी रामायण, रामायणातील रामकथा, व्यासांचे रामोपाख्यान, पुराणातील रामकथा, भासाचे प्रतिमानाटक, कालिदासाचे रघुवंश, प्रवरसेनाचे सेतुबंध, तुलसीदासांचे रामचरितमानस, एकनाथांचे भावार्थरामायण, गदिमांचे गीतरामायण, दक्षिणेतील रामायण, जैन, बौद्ध व सिख रामायण, विदेशातील रामायण, चित्रातील रामकथा, परदेशातील रामचित्रकथा, शिल्पातील रामकथा, नृत्य – नाट्यातील रामकथा, लोककलेतील रामायण, आधुनिक रामकथा, रामायणातील संदेशकाव्य, तारक रामायण, रामायण – एक सांस्कृतिक वारसा, रामायण – काल, आज आणि उद्या अशा चोवीस प्रकरणातून ही माला अलगद उलगडत जाते.

सोप्या आणि प्रवाही भाषेतील कथन हे दीपाली पाटवदकरांचा अभ्यास व विषयातील सामरस्य यांची जाणीव करून देते. विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, पुणे यांनी हे अनेकरंगी आणि विविध शैलीतील रामायण चित्रांनी समृद्ध असलेले ११२ पृष्ठांचे सुबक पुस्तक अप्रतिम मुखपृष्ठ लेवून वाचकांसमोर सादर केले आहे. रामांना नव्हे तर रामायणाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेले असे हे अनोखे पुस्तक आहे.

पुस्तकाचे नाव – रामकथामाला ( रामकथेच्या दिग्विजयाची कथा सांगणारी )

लेखिका – दीपाली नरेंद्र पाटवदकर

किंमत – २०० रुपये

प्रकाशक – विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग, पुणे

संपर्क – ९८८१० ६१६८६

दीपाली पाटवदकर आणि डॉ सच्चिदानंद शेवडे

Related posts

रत्नाकर काव्य पुरस्कार जाहीर

मुर्झाच्या संमेलनात झाडीबोलीचा जागर

मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे अरविंद गोखले, विद्याधर निमकर यांना पुरस्कार

Leave a Comment