आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे, मोबाईल – 9423217495
प्रश्न – पाऊस लागून राहील झड स्वरूपात की वळीव सारखा येऊन उघडुन जाईल ?
माणिकराव खुळे : ह्या दिवसात झड लागत नाही
प्रश्न – 24 सप्टेंबर 2019 या दिवसापासून पुढील नऊ दिवस सलग झड होती ? यंदा अशी स्थिती राहील का ?
माणिकराव खुळे : अति टोकाचे १०२ वर्षानंतर २०१९ सप्टेंबरच्या शेवटच्या १० दिवसात, परतीचा पाऊस फिरण्यापूर्वी बळकट आयओडी व १० दिवस एकाच ठिकाणी खिळलेल्या डिप्रेशनमुळे तयार झालेल्या वातावरणातून तो पाऊस होता. तो झडीचा नव्हे तर उत्तरा नक्षत्रातील वळीव स्वरूपातील गडगडाटीचा पाऊस होता. बिहार, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश व काहीसा गुजरातमध्ये महापुराने ही राज्ये धुवून काढणारा तो पाऊस होता. त्यामुळे त्याचा झडीशी संबंध लावू नये. जसा भूकंप दरवर्षी होत नाही, तसे प्रत्येक सप्टेंबर महिन्यातील पावसाशी त्याचा संबंध लावू नये.
असे वातावरण क्वचितच एखाद्या वर्षी घडून येते.
प्रश्न – यंदा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस कसा राहील ?
माणिकराव खुळे : सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील तिसऱ्या व शेवटच्या आवर्तनात जोरदार पावसासहित कृष्णा, कोयना व गोदावरी नद्यांच्या खोऱ्यात पूर पाण्याची शक्यता आहे.
सप्टेंबरच्या शेवटच्या व तिसऱ्या( २३ ते २७ दरम्यानच्या) आवर्तनात आजपासुन पुढील पाच दिवस संपूर्ण महाराष्ट्रात वीजा व गडगडाटीसह जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. अंदाजे ७ सेमी. किंवा त्यापेक्षा अधिक व १२ सेमी. च्या खाली अश्या श्रेणीतील एका दिवसात होवु शकणाऱ्या पावसाला जोरदार पाऊस संबोधतात.
अतिजोरदार पावसाची तीव्रता खान्देश, नाशिक, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील पर्जन्यच्छायेतील प्रदेशात जोरदार तर विशेषतः गुरुवार दि.२६ सप्टेंबर ला मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
अंदाजे १२ ते २० सेमी. दरम्यानच्या श्रेणीतील एका दिवसात होवु शकणाऱ्या पावसाला अतिजोरदार पाऊस संबोधतात.
प्रश्न – परतीचा पाऊस परतण्यास केंव्हा सुरुवात होईल ?
माणिकराव खुळे : अति वायव्य राजस्थान व कच्छ परिसरातून वायव्यई वारा, खालावणारी आर्द्रता व प्रत्यावर्ती वाऱ्याची स्थिती ह्या बदलानुसार, आज सोमवार दि. २३ सप्टेंबर पासून. मान्सून राजस्थान कच्छ मधून परतण्यास सुरवात झाली आहे.
प्रश्न – अशा कालावधीत शेती कामाचे नियोजन कसे करावे ?
माणिकराव खुळे : मंगळवार व गुरुवार (२४, २६ सप्टेंबर) ला शेतपिके काढणी व शेत मशागतीला पावसामुळे अडचणी निर्माण येऊ शकतात, असे वाटते. शेतकऱ्यांनी शेतकामाचे नियोजन त्याप्रमाणे करावे असे वाटते. शनिवार दि. २८ सप्टेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर काही दिवसाकरिता कमी होईल, असे वाटते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.