December 18, 2024
Cold wave continues in Maharashtra
Home » महाराष्ट्रात थंडीची लाट कायम
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्रात थंडीची लाट कायम

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

‘ महाराष्ट्रात थंडीची लाट कायम ‘

वायव्य भारतात समुद्रसपाटीपासून दिड किमी. उंचीपर्यंत मध्यप्रदेशातील विदिशाच्या आसपास केंद्रबिंदू स्थित, घड्याळकाटा दिशेनचे  प्रत्यावर्ती (घुसळल्यासारखे) बाहेर फेकणारे चक्रीय थंड वाऱ्यामुळे उत्तर भारतातील थंडी महाराष्ट्रात पूर्व दिशेने फेकली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात थंडीची लाट तर काही ठिकाणी थंडीच्या लाट सदृश्य स्थिती जाणवत आहे.

सकाळी साडे आठच्या निरीक्षणावरून महाराष्ट्रात थंडीची लाट किंवा थंडीच्या लाट सदृश्य स्थिती जाणवणाऱ्या ठिकाणांचे आजचे किमान तापमान डिग्री सेन्टीग्रेड मध्ये असे
कंसातील अंक सरासरीपेक्षा झालेली घसरण दाखवते.
अहिल्यानगर ५. ५(-५.६), परभणी ८. ३(-५.६), , नागपूर ९. ४(-५), मुंबई सांताक्रूझ १४ (-४.५), सोलापूर ११.५(-४.५), धाराशिव९.४(-४.४), चंद्रपूर १०.⅘(-३.६), अकोला ९.९(-३.८), डहाणू १५(-३.६), नाशिक ९.४ (-२.९), पुणे ७.८(-४.३), सं. नगर ९. ६(-३.१), अमरावती १०. ६(-३.६),  बुलढाणा ११. ४(-३. ३), चंद्रपूर १०.४(-३. ६), वर्धा ९. ४(-४. १),

सध्या जाणवत असलेली अपेक्षित  थंडी बुधवार दि. १८ डिसेंबर(संकष्टी चतुर्थी)पर्यन्त टिकून राहण्याची शक्यता ही कायम आहेच.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading