February 5, 2023
how to develop Childs mind
Home » मुलांच्या अभ्यासाची चिंता सतावतेय …मग हा करा उपाय
मुक्त संवाद

मुलांच्या अभ्यासाची चिंता सतावतेय …मग हा करा उपाय

मुलांच्या अभ्यासाची चिंता अनेक पालकांना सतावत आहे. मुलं मोबाईलमध्ये अडकली आहेत. त्यामुळे पुढे कसे होणार? असा यक्ष प्रश्न पालकांसमोर उभा राहीला आहे. मुलांचा अभ्यास चांगला व्हावा, असे वाटतंय, तर …

सदाशिव बाळकृष्ण पांचाळ.
एज्यूकेशनल एडव्हायजर. माईंड ट्रेनर, समुपदेशक
मोटीव्हेशनल स्पिकर
9923590942

मुलांबरोबरोबर सर्वांनी एकत्र जेवायला बसायचे. दुपारी शक्य नसल्यास रात्री बसावे. जेवताना आज दिवसभरात काय काय घडले, आपले अनुभव मुलांशी शेअर करायचे. आपसुकच मुलंही आपल्यासोबत शाळेत काय घडले ते सांगायला सुरूवात करतील. बोलण्याची सवय आपोआपच लागेल. व्यक्त होण्यासाठी पालकांना वेगळे प्रयत्न करायची गरज लागणार नाही.

मुलं बरोबर बोलतात की नाही, हेही आपल्याला कळेल. चुकीचा शब्द मुलांनी वापरल्यास न रागवता त्यांना त्या बद्दल समज द्यावी. जेवण झाल्यावरसुध्दा आपल्याला गप्पा करता येतील. यातून चांगल्या संस्कारांच्या गोष्टी, घडलेल्या घटना मुलांना सांगा, त्यांच्याकडून ऐकण्याचाही प्रयत्न करा.

मुलांनी चांगलं बोलावं, असं वाटतं असल्यास त्यांना अवांतर वाचनाची सवय लावा. रोज विविध कथा-कादंबऱ्या किंवा अन्य विषयाची पुस्तके, वर्तमानपत्र वाचन करायला लावा. त्यासाठी आधी आपण वाचन करा. मुलं आपलं अनुकरण करत असतात. त्यामुळे ते तुम्ही कराल, तेच मुलं करतील. आई चपाती बनवायला गेली की मुलांना चपाती बनवावी असं वाटतं, त्याप्रमाणे करू दिल्यास त्या त्या गोष्टींची आवड निर्माण होते. निर्माण करण्यासाठी गोष्टींच्या पुस्तकांचा वापर करा. वाचनामुळे मुलांची बोलण्याची भाषा सुधारेल. व्याकरण आपसूकच समजू लागेल. लिहीतांना अडचणी कमी होतील. जेवढं वाचन केलं, ते पुन्हा तुम्हाला सांगायला सांगा. जेणेकरून मुलांनी काय वाचलंय, आणि ते त्यांच्या डोक्यात किती गेलं, हे समजेल. एकदा वाचलेले अनेकदा विचारून मुलांना बोलते करायचा प्रयत्न करा.

एकाच विषयावर वारंवार चर्चा करा, तो विषय मुलांच्या धड्यातील असेल तर अभ्यासही होईल. पालकांनी आपण आधी धडा वाचा. नंतर मुलांना वाचायला सांगा. मग त्यावर चर्चा करा. म्हणजे मुलं विसरणार नाहीत. वारंवार चर्चा केल्यास तो विषय पर्मनंट मेमरीमध्ये (स्मरणशक्ती) सेट होईल. विसरायचं म्हटलं, तरी विसरणार नाहीत. मग कधीतरी घरातील सर्व मंडळी प्रेक्षक म्हणून मुलांना एखादी गोष्ट सांगायला सांगा. मुलांनी तोडक मोडक काहीही सांगायचा प्रयत्न जरी केला, तरी त्यांची वाहवा करा. त्यामुळे मुलांना प्रोत्साहन मिळेल. दुसऱ्यावेळी बोलायला तयार होतील. असा प्रयत्न झाल्यास मुलांमधील‌ चांगला वक्ता तुम्हाला दिसू लागेल. बोलतो आहे, बोलण्यात सुधारणा आहे असे वाटत असल्यास आणि प्रोत्साहन मिळाल्यास मुलं तयार होतील. यामुळे मुलांना वाचनाची सवय लागेल, तसेच मुलं चांगल्या प्रकारे बोलू लागतील. अभ्यासही होईल. मुलांच्या चारही बाजू भक्कम होतील. मोबाईलची सवय नकळतपणे मोडेल. केवळ जेवण एकत्र घेतल्यास मुलांमध्ये असा बदल शक्य आहे. करून तर पाहा.

Related posts

लाईक अन् कमेंट्स…

‘गुणीसोबत शिकूया’ तून मनोरंजनातून मुलांचे ज्ञानवर्धन

साहित्यिक आठवणींचा पीठाक्षरं भाग – ३

Leave a Comment