सोलापूर – वडशिवणे ता. करमाळा जि. सोलापूर येथील विश्वकर्माी तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोक संस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार साहित्य कृतीना २०२४ या कालखंडातील देण्यात येणारा गावगाडा साहित्य पुरस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ मधुकर टकले यांनी आज जाहीर केले. पुरस्काराचे हे १४ वे वर्ष आहे.
गावगाडा साहित्य पुरस्कार प्रकाश सोनाळकर (कागल) यांच्या राजगृहाच्या खिडकीतून’ या कादंबरीस, सुनील उबाळे (छत्रपती संभाजीनगर) यांच्या ‘उलट्या कडीचं घर या कवितासंग्रहास तर हबीब भंडारे (छत्रपती संभाजीनगर) यांच्या ‘निळे निळे आभाळाचे डोळे’, या बाल कवितासंग्रहास देण्यात आला आहे.
गावगाडा प्रेरणा साहित्य पुरस्कार गौरी रत्नपारखी (पुणे) यांच्या ‘रूम नंबर. ६’, या नाटकास, आशा नेगी (पुणे) यांच्या ‘ब्युटी ऑफ लाईफ’, द डायरी ऑफ कॅन्सर सर्व्हायवर, या आत्मकथनपर साहित्यकृतीस देण्यात आला आहे.
मातोश्री रुक्मिणी पांडुरंग भोसले स्मृति पुरस्कार इंद्रजित घुले व भरत दौंडकर (मंगळवेढा) यांच्या ‘कवितेच्या ‘नाना’ कळा’, ‘रामदास फुटाणे आणि काव्य चळवळ’ या संपादनास तर प्रा. प्रमोद नारायणे (वर्धा) यांच्या ‘शरदचंद्र मुक्ती बोधांची कविता’, ‘आस्वाद आणि आकलन’ या समीक्षा ग्रंथास देण्यात आला आहे.
मातोश्री रत्नमाला बबन पिसाळ स्मृती पुरस्कार सौ. निर्मला शेवाळे (मुंबई) यांच्या ‘करंजमाळ’ या ललित संग्रहास तर सौ. अलकनंदा घुगे – आंधळे (छत्रपती संभाजीनगर) यांच्या ‘अर्धी कोयता’ या कथासंग्रहास देण्यात आला आहे.
या पुरस्कारांचे स्वरूप शाल, स्मृतिचिन्ह, ग्रंथ, रोख रक्कम असे आहे. पार्थ पोळके, दिनेश आदलिंग, डॉ. जनार्दन भोसले, दत्तात्रय पिसाळ, बाबुराव इंगळे, प्रा. डॉ. संजय चौधरी, प्रा. डॉ. मच्छिंद्र नांगरे, प्रा. डॉ. संतोष साळुंखे, श्रीकृष्ण जगदाळे, प्रा. हरिचंद्र साळुंके, कु. प्रज्ञा दिक्षित, लक्ष्मण जगदाळे गुरुजी यांनी साहित्य कलाकृती पुरस्कार निवडीचे काम पाहिले, अशी माहिती विश्वकर्मा तरुण मंडळाचे अध्यक्ष टकले यांनी दिली.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.