कामेश्वरी साहित्य मंडळ व स्वातंत्र्यसैनिक बाळकृष्ण विष्णूजी पाटील सामाजिक संस्था कामेरी (ता.वाळवा जि. सांगली) यांचे वतीने देण्यात येणारे २०२२ चे राज्यस्तरीय हौसाई मातृस्मृती साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांनी या पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली.
साहित्य पुरस्कार निवेदनास महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळाला असून विविध वाड्मय प्रकारात साहित्यिकांनी दोनशेहून अधिक पुस्तके पाठवली होती. पुरस्कार निवडीसाठी वाड्मयीन तज्ञ परीक्षक नेमले होते.
जाहीर करण्यात आलेले पुरस्कार असे –
१) कादंबरी- ” शेवटची लाओग्राफिया”- प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे, गुहागर
२) कथासंग्रह- वर्तमान- प्रा. डॉ. कीर्ती मुळीक, पुणे
३) कवितासंग्रह- उमलावे आतुनीच- प्रा प्रतिभा सराफ, मुंबई
४) संकीर्ण – अक्षरलिपी- प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार,कोल्हापूर
५) बालसाहित्य – जगावेगळा कीर्तनकार- बबन शिंदे, कळमनुरी, हिंगोली
६) ललित – पाय आणि वाटा- सचिन वसंत पाटील कर्नाळ, सांगली
७) कथासंग्रह- सारिपाट ( कथाकार रावजी संताजी शिंदे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार) – अंकुश गाजरे,शेळवे, सोलापूर
८) कवितासंग्रह- घामाची ओल धरून- (शीघ्रकवी, तमाशा सम्राट, नायकू जाधव राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार) आबासाहेब पाटील, मंगसुळी
९) ललित गद्य – संकल्प सिद्धी (हुतात्मा विष्णू भाऊ बारपटे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार) प्राचार्य गो. वि. कुलकर्णी,कराड
कामेरी येथे होणाऱ्या कै. हौसाई मातृस्मृती साहित्यसंमेलनात साहित्य पुरस्कार वितरण मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते करण्यात येणार आहे. साहित्य पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.