September 9, 2024
Heavy rains will continue till August 25
Home » पावसाचा जोर २५ ऑगस्ट पर्यन्त कायम
गप्पा-टप्पा

पावसाचा जोर २५ ऑगस्ट पर्यन्त कायम

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

  • २६ ते ३० ऑगस्ट उन्हाची ताप पुन्हा उसळणार
  • ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान पुन्हा पावसाची शक्यता
  • सप्टेंबरमध्ये एकूण तीन आवर्तनातून पावसाची शक्यता

कसा असेल पावसाचा जोर ?

रविवार ( २५ ऑगस्ट) पर्यन्त संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता कायम आहे. विशेषतः शनिवारी ( दि. २४ ऑगस्टला) नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगांव, पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, रायगड, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली ह्या १६ जिल्ह्यात तर रविवारी ( दि. २५ ऑगस्टला) संपूर्ण महाराष्ट्रात दुपारनंतर गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता जाणवते.

या आठवड्यात वातावरणातील तापमान कसे राहील ?

अक्षवृत्तासमांतर दक्षिणोत्तर उतराईकडे जाणारा हवेच्या दाबाच्या ढाळा (प्रेशर ग्रेडीएन्ट) ची गैरहजेरीतून व आर्द्रतायुक्त पश्चिमी वाऱ्यांचा अभावातून आणि वाढणाऱ्या १००६ हेक्टपास्कलपर्यंतचा एकजिनसी हवेचा दाबातून, सोमवार (दि.२६) ते शुक्रवार (दि. ३० ऑगस्ट) दरम्यानच्या पाच दिवसादरम्यान कमाल तापमान वाढीबरोबर महाराष्ट्रात पुन्हा उन्हाची ताप उसळण्याची शक्यता जाणवते. तरीही दुपारनंतर पावसाची शक्यता ही आहेच.

सप्टेंबर महिन्यात कसा असेल पाऊस ?

शनिवार ( दि. ३१ ऑगस्ट) ते गुरुवार (दि.५ सप्टेंबर) या कालावधीत अर्थात सप्टेंबरच्या पहिल्या सप्ताहात महाराष्ट्रात पुन्हा मध्यम पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः संपूर्ण विदर्भ, खान्देश, नाशिक व मुंबईत अश्या १६ जिल्ह्यात कदाचित एखाद्या-दुसऱ्या दिवशी तर जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही

सप्टेंबरातील पावसांचे आवर्तने अशी राहतील –

सप्टेंबर महिना हा अधिक प्रकाशमान दिवसाचा व उष्णतेचा महिना असतो. मुंबईसह कोकणात १५, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात १० ते १२, तर उर्वरित विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात ५ ते ७ अश्या सरासरी पावसाळी दिवसाचा हा महिना असतो. ह्यावर्षी १ ते ५, व १२ ते १६ आणि २५ ते २९ सप्टेंबर अश्या प्रत्येकी पाच दिवसाच्या तीन आवर्तनातून महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात अंदाजे दहा ते बारा पावसाळी दिवसातून पावसाची तसेच धरणे ओसंडून नद्या खळखळण्याची व विहिरी व जमीन पाणीपातळीत वाढीची अपेक्षा करू या.
         
सध्याचा पाऊस कश्यामुळे आहे ?

i) मान्सूनचा मुख्य आसाचे पश्चिमी टोक सरासरी जागेच्या दक्षिणेला तर पुरवी टोक सरासरी जागेवर व
ii) मॅडन ज्यूलियन ऑसिलेशन (एम.जे.ओ)ची चांगलीच साथ मिळत आहे, आणि शिवाय
iii) सध्याच्या उष्णतेच्या तापीची साथ होत आहे.
iv) बंगाल उपसागरात कमी दाब निर्मितीची शक्यता ह्या सर्वांच्या एकत्रित परिणामातून आजपासुन रविवार ( दि. २५ ऑगस्टपर्यन्त) महाराष्ट्रात दुपारनंतर गडगडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

शिक्षित लोकप्रतिनीधी ?

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी एक गोष्ट…

भाषेतील बोलीचे रेशीमबंध अन् भाषिक आतंकवाद

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading