हिरवं पाखरू
हिरव्या रानी “हिरवं पाखरू”
अवचित येऊन लागलं फिरू
चुकवून डोळा उभं बांधावर
कुठून आलं त्या कसं विचारू
नजर शोधते काय हेरते
बाई मोठी सराईत वाटते
हिरव्या पोपटा लाल चोच
जशी कुणाची वाट पहाते!
अंग शेलाट नजर भिरभिरती
तिरक्या नजरेने काय शोधती
हाती भेंडीचा “फोक घेऊनी”
धावतेय कोणत्या वळू मागुती
केस मोकळे “शहरी” वाटते
पदर “खोचून” चापून चोपून
लक्ष कुणावर ठेवलंय रोखून
थांगपत्ता न तो देई लागून
पायी पैजण नवीन वाटती
वाट कुणाची पहात उभी ती
सांज समयाला असं पाखरू
येईल का जाळ्यात आपल्या ती
अशा निवांत भलत्या क्षणाला
उभी एकली कां बर राहीली
चौकशी कराया हवी आपणा
आपल्या गावी जबाबदारी आपली
विनायक जोशी
ठाणे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.