वाशिम – लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत ‘कला-गंगा’ ग्रामीण कादंबरी पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन वत्सगुल्म फाउंडेशनने केले आहे. हा पुरस्कार नवोदित ग्रामीण कादंबरीकारांसाठी असून पुरस्काराचे स्वरूप दहा हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह असे आहे, अशी माहिती प्रा. गजानन वाघ यांनी दिली आहे.
नव लेखकांच्या पहिल्याच ग्रामीण कादंबरीसाठी ही योजना करून कादंबरीचा विषय बदलत्या ग्रामीण वास्तवाशी संबंधित असावा. तसेच कादंबरी चरित्रपर,आत्मकथनपर, अनुवादित, भाषांतरीत नसावी. कादंबरीचा विषय हा स्वतंत्र असावा. ही कादंबरी १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या काळात प्रकाशित झालेली असावी. निवड झालेल्या पुरस्काराचे वितरण १० फेब्रुवारी २०२५ रोजी कै. द. चि. सोमण व्याख्यानमालेत करण्यात येणार आहे. तरी इच्छुक लेखकांनी व प्रकाशकांनी कादंबरीच्या दोन प्रती २५ जानेवारी २०२५ पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
प्रा. गजानन वाघ,
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय,
लाखाळा, रिसोड रोड, वाशीम ता. जि. वाशीम – 444505
संपर्क – 7588960918
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.