चिमणी आई व्याली घरासमोर
पिल्लं सात तिची सुंदर
दीपूला लागला लळा फार
चिमणीचा विश्र्वास तिच्यावर फार ॥१॥
पिलू पडे धप्पकन गटारा
दीपिकाचा जीव कावरा-बावरा
आरडा ओरडा हाका मारी
पिलाला काढल्यावर उड्या मारी॥२॥
एकदा काय झालं….
पिल्लू एक पडले गटारी
काही केल्या निघेना बाहेरी
दीपिका झाली भयभीत भारी
म्हणे,पिलाला काढा लवकरी॥३॥
सर्वांनी केली पराकाष्ठा प्रयत्नांची
छोट्या पिलाचा जीव वाचवण्याची
यश काही येईच ना
दीपिका रडायची थांबेच ना॥४॥
शेवटी केला १०१ ला फोन
गाडीतून आली माणसे दोन
झाली गोळा गल्ली सारी
म्हणती दीपिकाचे प्रेमच भारी ॥५॥
अखेर काढले बाहेर पिलाला
टॉवेल, गरम पाणी अंघोळीला
माणूसकी आणखीन दुसरी काय
खुश दीपू, पिल्लाचीही माय ॥६॥
कवयित्री – आशारेखा (रेखा दीक्षित), कोल्हापूर
मोबाईल नंबर 9284046023
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.