साखराळे येथे ६ऑगस्टला रंग पावसाचे खुले कविसंमेलन
‘सा कला विमुक्तये !’ हे ब्रीद घेऊन साहित्य, नाट्य, संगीत अशा सर्व कलाक्षेत्रात काम करणाऱ्या संस्कार भारतीची पश्चिम प्रांत, सांगली जिल्हा समितीची साहित्य विधा आणि जिल्हा परिषद शाळा क्र.१ व २, साखराळे यांच्या वतीने ६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता जिल्हा परिषद शाळा साखराळे येथे ‘ रंग पावसाचे ‘ हे खुले कविसंमेलनाचे आयोजित करण्यात आलेले आहे.
ज्येष्ठ कवयित्री अस्मिता इनामदार (सांगली) या कविसंमेलनाचे संमेलनाध्यक्षपद भूषवणार असून प्रसिद्ध कवी व गझलकार विनायक कुलकर्णी (सांगली) हे या संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. या संमेलनाला सन्मानीय अतिथी म्हणून साहित्यिक आणि तिळगंगा साहित्यरंग परिवार,पेठ चे अध्यक्ष मेहबूब जमादार, साखराळेच्या लोकनियुक्त सरपंच सुजाता जयकर डांगे
आणि उपसरपंच बाबुराव निवृत्ती पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
कवयित्री -गझलकार मनीषा रायजादे-पाटील या सूत्रसंचालन करणार असून कवयित्री सुनीता कुलकर्णी, कवी महादेव हवालदार, मुख्याध्यापिका उज्वला मोहन माने व गीता सदानंद इनामदार आणि संस्कार भारतीच्या सहसचिव प्रज्ञा भागवत कविसंमेलनाचे संयोजन करत आहेत. हे कविसंमेलन सर्व कवी-कवयित्री यांच्यासाठी खुले असून नामवंत व नवोदित कवी-कवयित्री यांनी आणि रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.