एक आठवण
आठवते मला ती
आज ही
अशाच एका सांजवेळी
मेघदूताबरोबर आली होती
लखलख बिजलीसह
हळूवारपणे पुढे सरकत
गाव शिवाराच्या वेशीवर
एक आगळा सुगंध दरवळत
तिच्या येण्याची चाहूल देऊन गेला
सरसर सरसर बरसली
स्पर्शून गेली अंगाला
अन् सुखद गारव्यात
तनाला मनाला
मनसोक्त चिंब भिजवून
नेत्रसुखात साठवून
आनंद परमानंद देऊन गेली
आठवते मला ती
आज ही
एक पावसाची सर….
कवी: चंद्रशेखर प्रभाकर कासार,
चांदवडकर, धुळे.
७५८८३१८५४३.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.