November 12, 2025
देशी गोवंशाचे आरोग्य व्यवस्थापन, वर्तन, आहार, लसीकरण तसेच शेळ्यांच्या जाती आणि संवर्धनाची उपयुक्त माहिती. पशुपालकांसाठी उपयुक्त मार्गदर्शक लेख.
Home » पशु संवर्धन सल्ला
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पशु संवर्धन सल्ला

✨देशी गोवंशाचे आरोग्य व्यवस्थापन

👉🏽जनावराच्या पाठीवर थाप मारली असता कातडी थरथरते. हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे.
👉🏽चांगले दूध देणारी गाय कधीही लठ्ठ नसते. गाईच्या छातीच्या शेवटच्या तीन फासळ्या दिसल्या पाहिजेत.
👉🏽चांगला आहार, लसीकरण, जंतनिर्मूलन, गोठ्यातील घरमाश्यांचे नियंत्रण, चुन्याच्या निवळीची फवारणी, गोचीड नियंत्रणाकडे कायम लक्ष द्यावे.

✨जनावरांचे वर्तन

👉🏽देशी गोवंशाचे वर्तन हा घटक खूप महात्त्वाचा आहे. आपण देशी गाई जशी सांभाळतो, त्याप्रमाणे ती आपणास प्रतिसाद देत असते. देशी जनावरांमध्ये वास, स्पर्श, दृष्टी आणि चव याचे ज्ञान खूप तीव्र असते.
👉🏽सहवासाचा गुण या जनावरांमध्ये उपजत असतो. गाईचा उत्तम दूध देण्याचा गुण हा त्यांच्या स्वभावधर्मावर अवलंबून आहे. स्वभावधर्म हा त्यांना मिळणाऱ्या वागणुकीवर, लहानपणापासून हाताळण्यावर अवलंबून आहे.
👉🏽जनावरे ही सवयीची गुलाम आहेत. चांगल्या सवयी लावण्यासाठी नियमित देखभाल गरजेची आहे. याकरिता त्यांचा स्वभाव आणि वागणुकीची माहिती आपणास असणे आवश्यक आहे.

शेळी पालन अन् शेळ्यांच्या जाती

👉🏽जगभरात सुमारे ५७६ शेळ्यांच्या जाती आहेत. नैसर्गिक निवडीमुळे, शेळ्यांमध्ये शारीरिक विविधतेची विस्तृत श्रेणी दिसते, ज्यामुळे त्यांना विविध वातावरणाशी जुळवून घेता येते.
👉🏽राष्ट्रीय प्राणी आनुवंशिक संसाधन ब्यूरोकडे देशातील ४१ नोंदणीकृत शेळ्यांच्या जातीची नोंदणी झाली आहे. या शेळ्या मोठ्या, मध्यम आणि लहान जातींमध्ये वर्गीकृत आहेत.
👉🏽शेळ्यांचे वितरण कृषी हवामानानुसार वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये उपयुक्ततेनुसार कमी अधिक दिसून येते.
👉🏽समशीतोष्ण हिमालयीन प्रदेशातील शेळ्या, जसे की चांगथांगी, गड्डी आणि चेगू या जाती मुलायम केस उत्पादनासाठी सुप्रसिद्ध आहेत.
👉🏽उत्तर आणि वायव्य प्रदेशातील शेळ्यांच्या जाती आकाराने मोठ्या असतात. या दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. यामध्ये जमुनापारी, बीटल, जखराणा आणि सुरती जातींचा समावेश आहे.
👉🏽दक्षिण आणि द्वीपकल्पीय भागात, दुहेरी उपयुक्तता असलेल्या (मांस आणि दूध) शेळ्या आढळतात. यामध्ये उस्मानाबादी, संगमनेरी आणि कन्नियाडू या जातींचा समावेश आहे.
👉🏽देशाच्या पूर्वेकडील भागात ब्लॅक बंगाल ही उच्च मांस उत्पादन क्षमता असणारी जात आढळून येते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading