March 28, 2024
Indira Sant Poetry presentation in Pimpri Chinchwad
Home » गंधगाभारामधून उलघडला कवयित्री इंदिरा संत यांचा काव्यप्रवास
काय चाललयं अवतीभवती

गंधगाभारामधून उलघडला कवयित्री इंदिरा संत यांचा काव्यप्रवास

पिंपरी चिंचवड महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवयित्री इंदिरा संत यांच्या काव्यावर आधारित ” गंधगाभारा ” हा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये इंदिरा संत यांचा काव्यप्रवास उलगडला गेला.

नको नको रे पावसा घालू धिंगाणा अवेळी
घर माझे चन्द्रमौळी अन दारात सायली 

अशा एकाहून एक निसर्ग, प्रेम, विरह, ओव्या, स्त्री भावनांवर काव्यरचना करणाऱ्या तसेच आपल्या तात्कालिन कवितांचा पगडा अजुनही रसिकमनावर कायम ठेवणाऱ्या प्रसिद्ध कवयित्री इंदिरा संत याचा काव्यप्रवास “गंध गाभारा” या विशेष कार्यक्रमातून अनुभवताना रसिक मंत्रमुग्ध झाले. 

निमित्त होते मराठी भाषा गौरव दिनाचे. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड आयोजित हा कार्यक्रम  स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, प्राधिकरण, निगडी येथे झाला. व्यासपीठावर माजी नगरसेविका शर्मिला बाबर, सामाजिक  कार्यकर्त्या सरिता साने, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, उपाध्यक्षा डॉ. रजनी शेठ  उपस्थित होते.

इंदिरा संत या प्रतिभावान कवयित्रीवर आधारित “गंधगाभारा” ची संहिताचे लेखन किरण लाखे यांचे होते. त्यामध्ये डॉ. समिता टिल्लू, इला पवार, जयश्री श्रीखंडे व प्राची कुलकर्णी यांनी आपापल्या शैलीने आशयपुर्ण भाष्य करत गद्यातून तसेच त्यांच्या विविध काव्यातून फेररफटका मारत रसिकांना खिळवून ठेवले.

कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त सादर झालेल्या या कार्यक्रमात कुसुमग्रज्यांच्या कणा, आगगाडी आणि जमीन, विजयोन्माद, पृथ्वीचे प्रेमगीत, पाचोळा या निवडक कविता विनीता श्रीखंडे, मंगला पाटसकर, नंदकुमार मुरडे, सुनिता बोडस, अंजली नवांगुळ यांनी त्यातील भावार्थ अर्थात रसग्रहणासहित सादर केल्या. 

राजन लाखे यांनी प्रास्तविक केले. माधुरी मंगरूळकर यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीकांत जोशी,  रजनी शेठ नंदकुमार मुरडे, दीपक अमोलिक यांनी संयोजन केले.

Related posts

सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेवून स्वराज्याची निर्मिती – डॉ. इस्माईल पठाण

काजव्यावरील शास्त्रीय अभ्यास…

शास्त्राचा उपयोग चांगल्यासाठी व्हावा

Leave a Comment