December 18, 2025
Dr Chandrakant Potdar elected as president of Kudremani Sahitya Sammelan in Belagavi
Home » कुद्रेमानी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. चंद्रकांत पोतदार
काय चाललयं अवतीभवती

कुद्रेमानी साहित्य संमेलन अध्यक्षपदी डॉ. चंद्रकांत पोतदार

बेळगाव : कुद्रेमानी (ता. बेळगाव) येथील श्री बलभीम साहित्य संघ व ग्रामस्थ आयोजित 20 वे साहित्य संमेलन रविवारी ( 28 डिसेंबर ) होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी कोल्हापूर येथील प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार यांची निवड करण्यात आली आहे.

बलभीम वाचनालयाच्या सभागृहात कार्यकर्त्यांची मंगळवारी रात्री बैठक झाली. अध्यक्षस्थानी साहित्य संघाचे अध्यक्ष उमेश गुरव होते. यावेळी साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा. डॉ. पोतदार यांची निवड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

प्रा. डॉ. पोतदार हे हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण पदवी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. ते सध्या सेवानिवृत्त असून कोल्हापूर येथे वास्तव्यास आहेत. कवी, लेखक, समीक्षक म्हणून ते ओळखले जातात. त्यांचे चार कवितासंग्रह, सहा समीक्षा ग्रंथ, संपादने प्रसिद्ध आहेत. यावेळी मंडळाचे सचिव एम. बी. गुरव, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी मुरकुटे, नागेश राजगोळकर, जी. जी. पाटील, महादेव गुरव, बाळाराम धामणेकर, मोहन शिंदे, शैलेश गुरव, मारुती पाटील, महेश पाटील, पी. एल. गुरव, अनंत लोहार आदी उपस्थित होते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading