रेडिमेड झालं जगणं
घराघरात मम्मी घुसली
आई बसली वेशीत
गावागावात माॅल आले
भाकर गेली एसीत
मिक्सर, कुकर, गॅसनं
घर डिजीटल झालंय
थालीपीठ, धपाटं, धिरडं
चुलीवरुन डिलिट झालंय
घराघरात घर करुन
पिझ्झा, ब्रेड, बर्गर, डोसा
एव्हरेस्ट, सुहाना, प्रवीण
रेडिमेड हिरवा ठेचा
आता ऐकूही येत नाही
वाटणं, कुटणं, ठेचणं
खणखणीत लोखंडी तव्यावर
झिंगे-बोंबिल भाजणं
पुस्तकात सापडतंय
शेंगुळ्या, भरित, माडगं
दही घुसळणारी उंच रवी
खणीचं खणखणीत गाडगं
गावरान शिवारी दाळदाणा
मुग-मटकी, नागली, वटाणा
कोंबडी, बोकड देशीच
घमघमघाट मसाला कुटाणा
आता सगळेच हायब्रिड
आजारसुध्दा विदेशी
माणूस थेट आयसीयुत
साधी चावली माशी
कवी – शिवाजी सातपुते ९०७५७०२७८९
- ज्ञानेश्वरांनी उलघडलेले देहाचे खरे स्वरूप
- वर्डकॅम्प : तंत्रज्ञान, संवाद आणि समुदायाची जागतिक चळवळ
- मीचि होऊनि आटले — म्हणजे काय ?
- फेरा जन्म मृत्यूचा’: समाजाच्या सद्सद््विवेकाला आवाहन
- अग्नी : मानवाच्या संरक्षणाची पहिली शस्त्रकला
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.





