February 22, 2024
shiva-rayas-dharmaniti-an-appraisal-book-by-dr-ismyel-pathan
Home » शिवरायांची धर्मनीती: एक आकलन
संशोधन आणि तंत्रज्ञान

शिवरायांची धर्मनीती: एक आकलन

डॉ. इस्माईल हुसेनसाहेब पठाण सर प्राचार्य म्हणून तिसंगी महाविद्यालयात १० वर्षे कार्यरत होते. सात वर्षाची प्रशासकीय सेवा त्यांनी शिवाजी विद्यापीठ केली. तब्बल १४ वर्षे सरांनी इतिहासाचे अध्यापन केले. या सर्व प्रवासात डॉ. पठाण एक अभ्यासक, संशोधक मराठ्याच्या इतिहासाचे चिकित्सिक जाणकार म्हणून कार्यमग्न राहिले.

निवृत्तीनंतर २०१८ मध्ये लगेचच त्यांनी ‘छत्रपती संभाजी महाराज’ हा ग्रंथ सिद्ध केला. आणि लगेचच ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा ग्रंथ ही पूर्ण केला. आता 2023 मध्ये सरांनी शिवरायांची धमनीती हा ग्रंथ आपल्यासाठी सादर करीत आहेत. डॉ पठाण यांचे वाचन, चिंतन, संशोधन, चिकाटी या गोष्टी सिद्ध करणारी ही कामगिरी आहे.

‘शिवरायांची धमनीती’ हा ग्रंथ ज्या कालात प्रसिद्ध होतो आहे त्याला एक वेगळे आणि अत्यंत महत्वाचे औचित्य आहे. ‘शिवाजी महाराज अलीकडे मालिका, सिनेमे काही सादरीकरणाच्या गोष्टी यातून जनसामान्यांच्यापुढे येत आहेत. जातीच्या, धर्माच्या, पंथांच्या अस्मिता टोकदार व्हायला लागल्या आहेत, किंबहुना त्या तशा करण्यासाठी समाजविघातक, अविचारी, अविवेकी मंडळी उन्मादी मंडळी वाढत आहेत अशा विपरित काळी, शिवरायांच्या धर्मनातीवर एक पुस्तक, लख्ख प्रकार टाकणारे, आपल्याला अधिक सूज्ञ, समजूतदार करणारे प्रकाशित होते आहे ही एक आश्वासक, समाधानाची, कौतुकाची गोष्ट आहे. सामाजिक सलोखा, जाती जातीतील स्नेहबंध अनुबंध, सर्वधर्मसमभाव या गोष्टी वर्धिष्णु होण्यासाठी या पुस्तकाचे मोल, अमोल आहे.

‘शिवरायांची धर्मनीती’ हे पुस्तक एका इतिहासाच्या अभ्यासकाने लिहिलेले पुस्तक आहे: विशेष बाब म्हणजे या गंभीर विषयावर लिहिताना डॉ. पठाण यांनी अनेक दिग्गज, इतिहासकार, संशोधक यांच्या ग्रंथाचे भरपूर संदर्भ दिले आहेत. सद्यस्थितीत आपापल्या धर्माचा आदर अधिकाधिक वाढत चाललेला दिसतो आहे. यातून स्वधर्म श्रेष्ठ परधर्म कनिष्ठ, कमी प्रतीचे असे पसरविणारी धर्माभिमानी मंडळी वाढत आहेत. अशावेळी महाराजांची धर्मनीती वाचणे, अभ्यासणे आवश्यक आहे.

डॉ. पठाण या पुस्तकात सप्रमाण काही गोष्टी मांडताहेत. महाराज मानवतावादी आणि पुरोगामी होते. त्यांची धर्मनीती याच दोन तत्त्वांवर आधारित आहे. आज एकविसाव्या शतकात, अत्यंत प्रगत काळातही धर्माच्या नावावर, क्रौर्य, हिंसा, अत्याचार, होते आहे हे लक्षात घेता तीन, चार शतकापूर्वीच्या काळात, सत्तेचा वापर शस्त्र वापरून केला जात होता, धर्माच्या नावाखाली जुलुम, कत्तली केल्या जात होत्या. त्या काळात शिवरायांनी जाती धर्मातील तेढ, आकस कमी करणारी सर्वधर्म समभाव मानणारी धर्मनीती अवलंबिली, हे या पुस्तकात वारंवार अधोरेखित होते.

शिवरायांनी आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला सर्वधर्मसमभावाचा वारसा अधिक समृद्ध केला. जगातल्या अनेक इतिहासकारांनी, व्यवस्थापन तज्ज्ञांनी ‘राजा’ कसा असावा याबद्दल अनेक मापदंड केले आहेत. अशा सर्व मापदंडांचे साक्षात प्रमाण म्हणजे ‘शिवराय आणि त्यांचे विचार, दृष्टी आणि राजनीती.

सर्वगुणसंपन्नता, सर्वगुणांचा समुच्यय, गुण वैशिष्ट्यांनी अलंकृत शिरोमणी असे समर्पक, यथार्थ वर्णन लेखकांनी केले आहे असे राजे शिवराय एक जगावेगळे व्यक्तिमत्व होते. धर्म मानणारे, अध्यात्माचे आकलन असणारे आणि धर्माची ताकद, प्रभाव, व्यक्ती आणि समाजाला सत्कृत्य आणि सन्मार्गावर चालत राहण्यायी दिशा देण्याची शक्ती, महाराज समजून होते.

राजनीती, युद्धनीती यांचा सखोल अभ्यास महाराजांना होताच पण त्याबरोबरच या दोन्हीसाठी उपयोगी पडणारी धमनीती राजाने अंगीकारणे आवश्यक अस‌ते. ते अत्यंत शहाणपणोन समजून उमजून राजांनी केले हे तपशीलासह डॉ. पठाण यांनी या ग्रंथात मांडले आहे.

लेखक ठाव सत्यान्वेशी भूमिका घेवून, सप्रमाण दाखले देत राजांच्या ‘धर्मनीती बद्दल लिहिता आहेत. धमाचे स्थान आणि मान ठेवून, त्याविषयी आदर श्रध्दा कायम ठेवून, समाजातील सर्व जाती धर्माच्या, मंदिरांना मशिदी व मठांना, सण उत्सवाना, महाराज सरळ हाताने मदत करीत आले आहेत. या खर्चाची कायम तरतूद व्हावी. निरंतर सहकार्य व्हावे म्हणून जमीनी इनाम म्हणून दिल्या आहेत. हे सर्व लेखकांनी अधोरेखित केले आहे. कोणाला, काम, केळा आणि किती मदत दिली याविषयी लेखकांनी, तत्कालीन राजाज्ञा, आदेश, तपशील मोची जंत्रीच दिली आहे.

हा ग्रंथ बाह्य आकाराने छोटा आणि पृष्ठसंख्या कमी असलेला आहे असे वाटते पण त्याचे परिशीलन केलेनंतर व मांडलेले सर्व गाळीव कष्टपूर्वक वेचलेले आणि इतिहास लेखनाच्या, शिस्तीत आणि नैतिकतेत बसवून रचलेले असे हे पुस्तक आहे. सर्व उच्चनीच मानलेल्या जातीतील लोकांना आपल्या राज्यात काम देणे, त्यांचा सन्मान करणे, जगण्याचे साधन देवून सबलीकरण करणे हे महाराजांचे महान कार्य लेखक प्रांजळपणे मांडताहेत.

आजच्या साडेतीनशे वर्षाच्या काळानंतर आपण समावेशनच्या, आरक्षणाच्य्या, गोष्टी करतो आहोत ते सर्वसमावेशक धोरण राजांनी केंव्हाच केले आहे हे सत्य आपले डोळे उघडणारे आणि राजांबद्दल अधिक आदर वाढविणारे आहे. अत्यंत प्रगल, (ultra modern AI) च्या जगात आपण वावरत आहोत पण आश्चर्याची गोष्ट आहे अत्यंत कठीण आवि धर्माचा पगडा असलेल्या त्या काळात राजे विज्ञानवादी भूमिका घेतात, अगदी घरच्या वैयक्तिक गोष्टीत सुध्दा ते अंधश्रध्दा मानत नाहीत. आपला, मानवतावादी दृष्टीकोन सोडत नाही, जातिभेदाला अनिष्ट गोष्टींना विरोध करतात हे लेखकांनी खूप स्पष्टतेने खुलासेवार मांडले आहे.

डॉ. पठाण यांचे हे पुस्तक अनेक अर्थांनी आजच्या स्थितीत फार मोलाचे आणि खूप काही शिकविणारे, उलगडून दाखविणारे आहे. हा ग्रंथ राजकारणी, लोकांनी विशेषतः धर्माचा दुराग्रह असणाऱ्या लोकांनी वाचायला हवेच. राजनीती, म्हणजे राजकारण, Politician and statesman यातला फरक न कळणाऱ्याराजकारण्यांनी महाराजांची धर्मनीती अभ्यासून आचरण, व्यवहार केला तर त्यांना खूपच फायदा होईल आणि समाजहित साधेल. हा ग्रंथ तरुणांनी विशेषतः थोडे फार शिकलेल्या महाविद्यालयीन तरुणांनी वाचायला हवा. कोणता झेंडा घेवू हाती असा प्रश्न पडलेल्या, गोंधळलेल्या युवा पिढीला हे मार्गदर्शक ठरणारे पुस्तक आहे.

जिझिया करासंबंधी महाराजांचे औरंगजेबाला लिहिलेले पत्र सर्वांनी आवर्जून वाचावे असे आहे. भडक, ऐकीव, खोट्या, गोष्टी, अफवा, स्टेट्स ठेवून समाजस्वास्य बिघडवण्यात कार्यरत असलेल्या लोकांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे. त्यांच्या वर्तनात इष्ट बदल होईल आणि अनेक अरिष्ट’ टाळता येतील. इतिहासाच्या, राज्यशास्त्राच्या प्राध्यापकांनी या पुस्तकांचा अभ्यास करून, प्रसंगानुरूप यातील, विशेष गोष्टी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या पाहिजेत. संशोधकानी या पुस्तकांचा अभ्यास अनेक अंगानी करण्यासारखा आहे. एखादा विषय तोही ‘धमनीती’ आणि ‘शिवरायांची धर्मनीती’ असा ग्रंथ लिहिले तो सप्रमाण पुराने दाखले तपशील, संदर्भ देवून लिहिणे आणि एक ठोस (focussed message) संदेश देणे हे सर्व कसे केले आहे ते समजून अशी तटस्थ वृत्ती ठेवून कसे लिहिता येते हे अभ्यासणे, उपयोगी आहे. महाराजांच्या धर्मनीतीवरचे हे पुस्तक वाचताना मला वारंवार वाटत राहिले. महाराजांच्या या धर्मनातीचा, समाजशास्त्रीय’ आणि मानसशास्त्रीय असा अभ्यास करण्यासारखे आहे.

Religion is the opium of the people असे जगप्रसिद्ध वचन, तत्वज्ञान मांडणाऱ्या कार्ल मार्क्स यांनी आपले म्हणणे मांडणारे Neo marxist धर्माबद्दल काही वेगळे, चांगले बोलतात त्याची आठवण हे पुस्तक वाचताना होते.

शिवाजी महाराज हा राजा जगावेगळा होता. तो कोणत्याच जातिधर्माचा द्वेष करणारा नव्हता. परधर्माचा आदर करणारा होता. सर्वसमावेशी’ घोरण अंमलात आणणारा द्रष्टा, विवेकी, राजा होता. या गोष्टी ठळक करणारे हे पुस्तक आहे.

पुस्तकाचे नाव – शिवरायांची धर्मनीती
लेखक – डॉ. इस्माईल हुसेन पठाण
प्रकाशक – मनोविकास प्रकाशन, मोबाईल – 8888550837
किंमत – १८० रुपये

Related posts

Navratri Theme : जैवविविधेतेची राखाटी छटा

प्लास्टिक प्रदूषणाचा पराभव करण्याचे आवाहन

आत्मज्ञान प्राप्तीचा भक्ती हाच सोपा मार्ग

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More