रेडिमेड झालं जगणं
घराघरात मम्मी घुसली
आई बसली वेशीत
गावागावात माॅल आले
भाकर गेली एसीत
मिक्सर, कुकर, गॅसनं
घर डिजीटल झालंय
थालीपीठ, धपाटं, धिरडं
चुलीवरुन डिलिट झालंय
घराघरात घर करुन
पिझ्झा, ब्रेड, बर्गर, डोसा
एव्हरेस्ट, सुहाना, प्रवीण
रेडिमेड हिरवा ठेचा
आता ऐकूही येत नाही
वाटणं, कुटणं, ठेचणं
खणखणीत लोखंडी तव्यावर
झिंगे-बोंबिल भाजणं
पुस्तकात सापडतंय
शेंगुळ्या, भरित, माडगं
दही घुसळणारी उंच रवी
खणीचं खणखणीत गाडगं
गावरान शिवारी दाळदाणा
मुग-मटकी, नागली, वटाणा
कोंबडी, बोकड देशीच
घमघमघाट मसाला कुटाणा
आता सगळेच हायब्रिड
आजारसुध्दा विदेशी
माणूस थेट आयसीयुत
साधी चावली माशी
कवी – शिवाजी सातपुते ९०७५७०२७८९
- शेतीचा हालअहवाल
- विवेकाचा आवाज
- स्पर्श दृक्श्राव्य दिवाळी अंक ‘ फक्त एका क्लिकवर
- कौल कोणाला…
- वंदना प्रकाशनतर्फे साहित्यकृतींना आशिर्वाद पुरस्कार
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.