महाराष्ट्र पक्षिमित्रचे पुरस्कार जाहीर
पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार श्री. गोविंद सबनीस यांना जाहीर
अमरावती : गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षीविषयक कार्य करणारी संस्था “महाराष्ट्र पक्षिमित्र” तर्फे देण्यात येणाऱ्या २०२४ च्या पक्षिमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीचा पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार पंढरपूर येथील गोविंद रघुनाथ सबनीस यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. जयंत वडतकर यांनी दिली.
इतर पुरस्कारांपैकी पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील फिरोज गुलाब चाऊस यांना तर पक्षी जनजागृती पुरस्कार वर्धा येथील राहुल वकारे यांना जाहीर करण्यात आला आहे.
यावर्षीपासून नव्याने सुरुवात झालेल्या पक्षी विषयक साहित्य पुरस्काराची घोषणा सुद्धा यावेळी करण्यात आली. यावर्षीचा पहिला पक्षी साहित्य पुरस्कार परभणी येथील माणिक प्रल्हाद पुरी यांना जाहीर करण्यात आला.
पक्षी सबंधित विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे २०१९ पासून या पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली असून यामध्ये दरवर्षी पाच पुरस्कार देण्यात येत असतात.
या पुरस्काराचे वितरण ३७ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात करण्यात येणार असून यावर्षी महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन शेवगाव जिल्हा अहिल्यानगर (अहमदनगर) येथे ०१ व ०२ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणार आहे. या पुरस्कारांचे वितरण संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी दिली आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.