July 27, 2024
Information and Broadcast ministry action on Fake u Tueb Channel
Home » बनावट बातम्या प्रसारित करणाऱ्या यूट्यूब वाहिन्यांवर कारवाई
काय चाललयं अवतीभवती

बनावट बातम्या प्रसारित करणाऱ्या यूट्यूब वाहिन्यांवर कारवाई

बनावट बातम्या प्रसारित करणाऱ्या यूट्यूब वाहिन्यांवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केली कारवाई

नवी दिल्ली – समन्वयाने काम करून  भारतात खोटी माहिती पसरवत असलेल्या सहा यूट्यूब वाहिन्यांचा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पीआयबी फॅक्ट चेक कक्षाने पर्दाफाश केला आहे. या वाहिन्यांद्वारे पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांचे खंडन करण्यासाठी 100 हून अधिक तथ्य-तपासण्यांचा समावेश असलेल्या  सहा वेगवेगळ्या  ट्विटची मालिका फॅक्ट चेक कक्षाने जारी केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या कक्षाची ही अशा प्रकारची ही दुसरी कारवाई आहे या कारवाईच्या माध्यमातून  संपूर्ण वाहिन्यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

या सहाही  युट्युब वाहिन्या  एका समन्वित अपप्रचार नेटवर्कचा भाग म्हणून कार्यरत असल्याचे आढळले, या वाहिन्यांची सदस्यसंख्या  जवळपास 20 लाख होती आणि त्यांच्या चित्रफिती 51 कोटींहून अधिक वेळा पाहिल्या गेल्या आहेत. पीयआयबीद्वारे तथ्य -तपासणी केलेल्या या यूट्युब वाहिन्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

SI. No.Name of YouTube ChannelSubscribersViews
 Nation Tv5.57 Lakh 21,09,87,523
 Samvaad Tv10.9 Lakh17,31,51,998
 Sarokar Bharat21.1 thousand45,00,971
 Nation 2425.4 thousand43,37,729
 Swarnim Bharat6.07 thousand10,13,013
 Samvaad Samachar3.48 Lakh11,93,05,103
Total20.47 Lakh51,32,96,337

पीआयबी फॅक्ट चेक कक्षाने  कारवाई  केलेल्या यूट्यूब वाहिन्यांनी  निवडणुका, सर्वोच्च न्यायालय आणि भारताच्या संसदेतील कार्यवाही, भारत सरकारचे कामकाज इत्यादींबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या.इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील बंदीबाबत खोटे दावे आणि भारताचे माननीय राष्ट्रपती, भारताचे माननीय सरन्यायाधीश यांच्यासह वरिष्ठ घटनात्मक अधिकाऱ्यांची   बनावट विधाने दाखवणे याचा यात समावेश आहे.

बनावट बातम्यांच्या आधारावर कमाई करणाऱ्या या वाहिन्या  बनावट बातम्यांच्या अर्थव्यवस्थेचा भाग आहेत . प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी आणि  या बातम्या खऱ्या आहेत यावर प्रेक्षकांचा विश्वास बसावा तसेच कमाई करण्याच्या दृष्टीने ,या वाहिन्यांद्वारे प्रसारित चित्रफितीच्या माध्यमातून ,वाहिनीवर प्रेक्षक संख्या वाढावी  यासाठी या वाहिन्या बनावट, क्लिकबेट आणि सनसनाटी लघुप्रतिमा (थंबनेल) आणि दूरचित्रवाहिन्यांवरील वृत्त निवेदकाच्या  प्रतिमा वापरत होत्या.

पीआयबी फॅक्ट चेक कक्षाने केलेली ही अशाप्रकारची दुसरी कारवाई आहे. यापूर्वीच्या एका मोठ्या कारवाईत, 20 डिसेंबर 2022 रोजी,या कक्षाने  खोट्या बातम्या पसरवणाऱ्या  तीन वाहिन्यांचा  पर्दाफाश केला होता.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

निरोगी करडांसाठी अशी घ्या शेळ्यांची काळजी

सर्वसामान्यांच्या शब्दातही प्रकटतो एकरुपतेतून ब्रह्मरस

समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करण्यात संशोधकांना यश

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading