कोल्हापूर – मातोश्री रेखा दिनकर गुरव यांच्या नावे देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारासाठी कथासंग्रह, कादंबरी, काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन रवींद्र गुरव यांनी केले आहे. १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित साहित्यकृती या पुरस्कारासाठी मागविण्यात येत आहेत. साहित्यकृतीच्या प्रत्येकी दोन प्रती, एक पानी अल्पपरिचय, व्हॉटस् ॲप नंबर, अल्पपरिचयाला टाचणी लावलेला एक फोटो यासह आपला प्रस्ताव १० एप्रिल २०२५ पर्यंत पाठवावा, असे आवाहन गुरव यांनी केले आहे.
सर्वोत्कृष्ट कथासंग्रह, कादंबरी व काव्यसंग्रहासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर साहित्यव्रती पुरस्कारासाठी दहा हजार रुपये रोख गौरवचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल एका ज्येष्ठ साहित्यिकास या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
साहित्यकृती पाठविण्याचा पत्ता-
रवींद्र रेखा गुरव,
मु. कोनवडे, पो. कूर,
ता. भुदरगड, जि. कोल्हापूर
पिन कोड ४१६ २०९
मोबाईल नंबर – 9552715910
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
राजकिय फुलबाज्या…