कविवर्य रेंदाळकर साहित्य पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन
रेंदाळ , जि. कोल्हापूर – येथील कविवर्य ए. पां. रेंदाळकर वाचनालयाच्या वतीने २०२३ सालासाठी कविता , कादंबरी आणि कथा या तीन साहित्यप्रकारांसाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्काराचे हे सहावे वर्ष असून, रुपये तीन हजार व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे, अशी माहिती आर. एम. पाटील यांनी दिली आहे.
१ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेल्या ग्रंथांचा या पुरस्कारासाठी विचार केला जाईल. प्रकाशित झालेले कविता , कादंबरी आणि कथा या प्रकारांतील ग्रंथ स्वतंत्र असावेत. ते अनुवादित अथवा भाषांतरित असू नयेत.
पुरस्कारासाठी इच्छुकांनी ग्रंथाच्या दोन प्रती अध्यक्ष , कविवर्य ए. पां. रेंदाळकर वाचनालय , रेंदाळ , ता. हातकणंगले , जि. कोल्हापूर- ४१६२०३ या पत्त्यावर १५ मे २०२४ पर्यंत पोस्टाने पाठवाव्यात असे सर्व लेखक – कवी आणि प्रकाशकांना आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी आर. एम. पाटील यांना ९८६०५३५३५९ संपर्क करावा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.