शास्त्रीय नाव : Benincasa hispida
इंग्रजी : Ash Gourd, Winter Melon
ललिता पंचमी दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाई राक्षसाचा वध करते याचे प्रतीक म्हणून कोहळा फोडला जातो. त्याला पांढरा भोपळा असेही म्हणातात. इंग्रजीत विंटर मेलॉन तर हिंदीत पेठा म्हणतात.
कोहळा ही वनस्पती मूळची जपान व इंडोनेशियातील असून नंतर तिचा प्रसार इतर प्रदेशांत झाला. पंजाब, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांत कोहळ्याची लागवड केली जाते.
अतिशय औषधी गुणधर्माचा कोहळा उत्तरेत खूप खाल्ला जातो. आग्र्याच्या पेठा यापासुन बनतो.
कोहळा मध्ये खूप पाणी आहे त्यामुळे तो शीतकारक आहे. त्यात खूप फायबर आहे. पचनशक्ती सुधारते.
पुष्कळ प्रमाणत व्हिटॅमिन सी आहे. अँटीऑक्सीडेंट आहेत. flavonoids आहेत, यामुळे त्वचेच्या पेशी तरुण होतात. रोज सकाळी ज्यूस घेतला तर उत्तम. निद्रानाश विकारात कोहळा चांगला.
आपल्या संस्कृतीमध्ये खूप सुंदर रीतीने सर्व फळांचा, भाज्यांचा उपयोग करायला सांगितलं आहे. कोहळा खा…सुंदर दिसा.
डॉ. प्रिया दंडगे
स्नेह क्लिनिक ,
ताराबाई पार्क ,सासणे ग्राउंड जवळ,
कोल्हापूर 9623895866
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.