April 16, 2024
Pruning in Rose farming Krushisamarpan article
Home » गुलाब शेतीमधील छाटणी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गुलाब शेतीमधील छाटणी

🌹 गुलाब शेतीमधील छाटणी 🌹

फुलांची संख्या वाढविण्यासाठी फांदीचा काही भाग काढण्याच्या क्रियेला ‘छाटणी’ म्हणतात. गुलाबाला नवीन वाढीवर फुले येतात. जुन्या फांद्यावर फुले येत नाहीत. नवीन फांद्यांची संख्या मर्यादित राहण्यास मदत होते. फांद्यांची गर्दी वाढल्यास झाडाचा आकार बिघडतो. छाटणीत जोमदार वाढीच्या निरोगी फांद्या ठेवून बारीक, कमजोर रोग व कीडग्रस्त, वाळलेल्या, अयोग्य दिशेत वाढणाऱ्या फांद्या काढाव्यात.

छाटणीचे उद्देश –

१) जुनाट भाग व निर्जीव फांद्या काढणे.
२) फुलांची संख्या वाढविणे.
३) रोग व कीडग्रस्त फांद्या काढणे.
४) फवारणी, फुलांची तोडणी व इतर आंतरमशागती सोप्या करणे.
५) कोवळ्या, गर्दी करणाऱ्या व वांझ फांद्या काढणे.
६) योग्य वेळी झाड बहारात आणणे.

झाडाच्या वाढीच्या सुरुवातीला चांगला आकर आणण्याकडे लक्ष द्यावे. निवडक फांद्या ठेवून बाकीचा भाग काढावा. झाड फुलावर येण्यास सुरुवात झाल्यानंतर नियमित छाटणी करावी. छाटणीची तीव्रता लक्षात घेतल्यास, गुलाबाच्या छाटणीचे प्रकार पडतात.

सौम्य छाटणी (Soft Pruning) –

फुलांचा बहार व पावसाला संपल्यानंतर छाटणी केली जाते. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीस छाटणी केली जात असल्याने ‘हिवाळी छाटणी’ असेही म्हणतात. पावसाळी बहार झाल्यानंतर दुसरा बहार येण्यासाठी ही छाटणी केली जाते. बहार नोव्हेंबरमध्ये सुरू होऊन फेब्रुवारी – मार्चपर्यंत चालतो. सौम्य छाटणीत फांदीचे शेंडे छाटले जातात. यामुळे झाडास फुले भरपूर लागतात, परंतु ती आकाराने लहान असतात.

मध्यम छाटणी (Medium Pruning) –

या छाटणीत फांद्याची खरडून अथवा फार उंचीवर छाटणी करत नाहीत. मध्यम उंचीवर म्हणजेच फांदीवर ७ ते ८ डोळे ठेवून छाटणी करतात. छाटणीनंतर ४० ते ५० दिवसांत नवीन फुटीवर फुले येतात. फुले भरपूर व मध्यम ते मोठ्या आकाराची असतात. मध्यम छाटणी झाडाची उंची मध्यम राहून डौलदार वाढतात.

कडक छाटणी (Heavy Pruning) –

कडक छाटणी उन्हाळा संपल्यानंतर म्हणजे मे महिन्याच्या शेवटी करावी. फांदीच्या खोडाकडील भागावर ३ ते ४ डोळे राखून छाटणी करावी. कडक छाटणीस ‘उन्हाळी छाटणी’ असेही म्हणतात. छाटणी उन्हाळ्यात लवकर करू नये. तसे केल्यास कोवळ्या कोंबांना इजा पोहोचते. छाटणी खोलवर केल्याने फुले संख्येने कमी असतात. परंतु आकाराने मोठी असतात.

छाटणीनंतर घ्यावयाची काळजी –

१) छाटणी योग्य वेळी करावी.
२) रोग – कीडग्रस्त व गर्दीच्या फांद्या काढाव्यात.
३) छाटणी केलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी.
४) धारदार सिकेटरने एकाच कापात छाटणी करावी.
५) छाटणीनंतर मशागत करून खत घालावे.

📚 संकलन – कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र राज्य

Related posts

गुरू शिष्याच्या संवादाची अनुभुती

महाराष्ट्रात उष्णतेत कशामुळे वाढ झाली आहे ?

जनसंपर्काच्या अंतरंगा’चा सर्वंकष वेध घेणारे पुस्तक

Leave a Comment