१७ नोव्हेंबरपासून नाइट कॉलेजमध्ये अभ्यासक्रम सुरू
कोल्हापूर – महाराष्ट्राच्या इतिहासात समृद्ध वारसा लाभलेल्या मोडी लिपीच्या वाचन-लेखनाचे प्रशिक्षण आता कोल्हापूरमध्ये उपलब्ध झाले आहे. नाइट कॉलेज, कोल्हापूरच्या मराठी विभागातर्फे आणि शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या मान्यतेने एक महिन्याचा ‘मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ १७ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू होत आहे.
हे प्रशिक्षण वर्ग सायंकाळी ६ ते ८ या वेळेत घेण्यात येणार असून, इयत्ता १० वी उत्तीर्ण असणाऱ्या कोणालाही या प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेता येणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मराठी विभागप्रमुख डॉ. अरुण शिंदे (मो. ९४२१०२४०५५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य प्रा. डॉ. उत्तम पाटील यांनी केले आहे.
📜 मोडी लिपीचे महत्त्व
मोडी लिपी ही एकेकाळी महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवहाराची प्रमुख लिपी होती. इ.स. १९६० पूर्वी जवळपास पाचशे वर्षे महसूल, न्यायालयीन आणि शासकीय कागदपत्रे मोडीत लिहिली जात होती. त्यामुळे आजही महसूल कार्यालये, जुनी न्यायालयीन नोंदी, जातीचे दाखले आणि ऐतिहासिक संशोधन यामध्ये मोडी कागदपत्रांचे प्रचंड भांडार आढळते.
🎓 करिअर आणि रोजगाराच्या संधी
मोडी लिपी शिकल्याने मोडी दस्तऐवजांचे भाषांतर, शासकीय-निमशासकीय सेवा, ऐतिहासिक संशोधन, आणि स्वयंरोजगार अशा अनेक क्षेत्रांत करिअरच्या संधी उपलब्ध होतात. मोडी वाचणारे तज्ज्ञ आजच्या काळात दुर्मिळ झाले असल्याने, या क्षेत्रात प्रशिक्षित व्यक्तींना विशेष मागणी आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
