मुंबई मराठी साहित्य संघातर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आल्याची माहिती कार्यवाह अशोक बेंडखळे यांनी दिली. या पुरस्कारांचे वितरण संघाच्या वर्धापनदिनी (ता. २९ ऑक्टोंबर) करण्यात येणार आहे. डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, अशोक बेंडखळे, रेखा नार्वेकर, पद्माकर शिरवाडकर, प्रतिभा सराफ, प्रतिभा विश्वास, नरेंद्र पाठक, एकनाथ आव्हाड, नारायण लाळे, प्रा. उषा तांबे, प्रकाश पागे यांच्या निवड समिती या पुरस्कारांची निवड केली आहे.
पुरस्कार प्राप्त मान्यवर असे –
मराठी यशवंत पुरस्कार –
डॉ. अनिल काकोडकर ( पुरस्काराचे स्वरुप – २५ हजार रुपये रोख व सन्मान पत्र)
सहचारिणी पुरस्कार –
श्रीमती शुभदा रवींद्र पिंगे ( पुरस्काराचे स्वरुप – 10 हजार रुपये रोख व सन्मान पत्र)
चंद्रगिरी पुरस्कार –
सुचिता घोरपडे ( ग्रामीण कथा – खुरपं) ( पुरस्काराचे स्वरुप – 10 हजार रुपये रोख व सन्मान पत्र)
बालसाहित्य पुरस्कार –
रमेश तांबे ( चिनुचे स्वप्न ) ( पुरस्काराचे स्वरुप – ५ हजार रुपये रोख व सन्मान पत्र)
कथाकार शांताराम पुरस्कार –
माधव सावरगावकर ( कथा कारखाण्यातल्या) ( पुरस्काराचे स्वरुप – 10 हजार रुपये रोख व सन्मान पत्र)
वैचारिक साहित्य पुरस्कार –
डॉ सुहास बागल ( चीनी महासत्तेचा उदय) ( पुरस्काराचे स्वरुप – 10 हजार रुपये रोख व सन्मान पत्र)
वि. पु. भागवत प्रकाशन पुरस्कार –
दत्ता डांगे, इसाप प्रकाशन, नांदेड ( पुरस्काराचे स्वरुप – ५ हजार रुपये रोख व सन्मान पत्र)
कै. नारायण काळे स्मृती पुरस्कार –
चंद्रकांत कुलकर्णी ( नाट्य दिग्दर्शक) ( पुरस्काराचे स्वरुप – 10 हजार रुपये रोख व सन्मान पत्र)
माधव जूलियन स्मृती पुरस्कार –
दत्ताराम गायकर (ग्रंथमित्र) ( पुरस्काराचे स्वरुप – 10 हजार रुपये रोख व सन्मान पत्र)
कै परुळेकर स्मृती पुरस्कार –
विद्याधर साठे (संत साहित्य अभ्यासक) ( पुरस्काराचे स्वरुप – 10 हजार रुपये रोख व सन्मान पत्र)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.