March 12, 2025
new-plant-species-discovered-devarukh-sady-ecology
Home » New Plant Species Discovered in Devarukh, Redefining Sady Ecology
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

देवरुखमधून प्रथमच वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध; सड्यांना मिळाली नवी ओळख

मुंबई – रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखच्या सड्यावरुन ‘इपिजिनिया’ कुळातील नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे (Iphigenia from devrukh). या प्रजातीचे नामकरण ‘इपिजिनिया देवरुखेन्सिस’ ( Iphigenia devrukhensis ), असे करण्यात आले आहे ( Iphigenia from devrukh ). देवरुखमधून प्रथमच वनस्पतीच्या एखाद्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे ( Iphigenia from devrukh ). पावसाळ्यात फुलणारी ही प्रजात जगात केवळ देवरुखच्या सड्यांवर आढळत असल्याने इथल्या सड्यांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. (Iphigenia from devrukh)

Iphigenia devrukhensisI phigenia from devrukh ( देवरुखस डाइपिजिनिया )

‘कॉलचीकेसी’ ( Colchicaceae ) या वनस्पतींच्या गटातील ‘इपिजिनिया’ या कुळात भारतात सात प्रजाती आढळतात. त्यामधील पाच प्रजाती या महाराष्ट्रात आढळतात. यामध्ये आता एका नव्या प्रजातीची भर पडली आहे. आठल्ये-सप्रे- पित्रे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रताप नाईकवडे आणि ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’चे कार्यकारी संचालक प्रतिक मोरे यांनी ‘इपिजिनिया देवरुखेन्सिस’ या प्रजातीचा शोध लावला आहे. न्यूझीलंडमधून प्रकाशित होणाऱ्या ‘फायटोटॅक्सा’ या नामांकित संशोधन नियतकालिकाच्या २६ फेब्रुवारी रोजीच्या अंकात या संदर्भातील शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

‘इपिजिनिया देवरुखेन्सिस’ ही प्रजात देवरुखमधील साडवली आणि आंबिवलीच्या सड्यावर पावसाळी हंगामात फुलते. जुन ते सप्टेंबर या काळात ती आपल्याला या दोन सड्यावर दिसून येते. या वनस्पतीवर गुलाबी रंगाची फुले फुलतात. ‘इपिजिनिया’ या प्रजातीला मराठीत भुईचक्र म्हटले जाते. ‘इपिजिनीया रत्नागिरीका’ ही प्रजात या नव्या प्रजातीशी साध्यर्म असणारी आहे. कोकण दिपकाडी या प्रजातीचा अभ्यास करताना मोरे आणि नाईकवाडे यांनी या नव्या प्रजातीचे निरीक्षण केले. त्यावेळी त्यांना देवरुखमधील ‘इपिजिनिया’चे काही भाग हे ‘इपिजिनीया रत्नागिरीका’ या प्रजातीपेक्षा वेगळे जाणवले. सूक्ष्म निरीक्षणाअंती देवरुखमधील ‘इपिजिनिया’ नवीन असण्यावर शिक्कामोर्तब झाले. ‘देवरुख शिक्षण प्रसारक मंडळा’च्या नावातील पहिले अक्षर घेऊन देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याप्रति कृतज्ञता म्हणून वनस्पतीच्या प्रजातीला ‘देवरुखेन्सिस’ हे नाव देण्यात आले आहे.

‘इपिजिनीया रत्नागिरीका’पेक्षा वेगळी

रत्नागिरीका या प्रजातीमध्ये स्त्रिकेसरावरील कूक्षी ही सरळ एकेरी असते. तर नवीन प्रजातीत ती त्रिदलीय आहे. बियांचा आकार लहान आहे. तसेच बियांची संख्या ही देखील रत्नागिरीका प्रजातीपेक्षा कमी आहे. बियांची रचना देखील एका बाजुला चपटी आहे. फुलातील अंडाशय हा थोडा गोलाकार आहे. फुलातील पुंकेसरातील वृंत हे परागकोषापेक्षा जास्त लांब आहेत. नव्या प्रजातीच्या फुलांच्या देठांची लांबी कमी आहे. तसेच जमिनीतील कंद हा लहान आकाराचा असून पानांची संख्याही कमी आहे. या वैशिष्ट्यामुळे तसेच फरकामुळे देवरूख परिसरात आढळणारी प्रजात ही रत्नागिरीका प्रजातीपासून भिन्न आणि नवीन असल्याचे सिद्ध झाले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading