September 12, 2024
photo-feature-Tiger Butterfly by Pratik More
Home » Photo Feature : रुईकर फुलपाखरे…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

Photo Feature : रुईकर फुलपाखरे…

अति पावसाच्या काळात ही फुलपाखरे जास्त पावसाच्या प्रदेशातून कमी पावसाकडे प्रयाण करतात. संध्याकाळच्या वेळी यांचे एकत्रित अनेक फुलपाखरं असणारे थवे आपल्याला झाडांवर विश्रांती घेताना दिसू शकतात. खुळखुळा प्रजातींच्या वनस्पतींशी या कुळाचे विशेष नाते आहे. खुळखुळा वनस्पतीच्या विविध भागातून रसायने मिळवण्यासाठी टायगर आणि क्रो फुलपाखरे जमा झालेली दिसतात.

प्रतिक मोरे, पर्यावरण अभ्यासक

रुईकर नावाने ओळखली जाणारी ही फुलपाखरे रुई आणि तत्सम मिल्कविड प्रजातींच्या झाडांना आपली खाद्य वनस्पती बनवतात. या Apocynaceae कुळातील वनस्पती अल्कलॉइड सारख्या रसायनांनी युक्त असतात. सुरवंट अवस्थेत ही रसायने शरीरात साचवून टायगर कुळातील फुलपाखरे विषारी किंवा खाण्यास बेचव (उलटी आणणारे) बनतात. यामुळे बहुतेक भक्षक यांना खाणे टाळतात आणि या फुलपाखरांचे संरक्षण होते.

या प्रजातींचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यांचे पावसाळी प्रदेशातून शुष्क प्रदेशाकडे चालणारे स्थलांतर. अति पावसाच्या काळात ही फुलपाखरे जास्त पावसाच्या प्रदेशातून कमी पावसाकडे प्रयाण करतात. संध्याकाळच्या वेळी यांचे एकत्रित अनेक फुलपाखरं असणारे थवे आपल्याला झाडांवर विश्रांती घेताना दिसू शकतात. खुळखुळा प्रजातींच्या वनस्पतींशी या कुळाचे विशेष नाते आहे. खुळखुळा वनस्पतीच्या विविध भागातून रसायने मिळवण्यासाठी टायगर आणि क्रो फुलपाखरे जमा झालेली दिसतात. यांच्या या गुणधर्माचा इतर फुलपाखरांनी फायदा उचललेला दिसतो . टायगर कुळातील फुलपाखरांशी साधर्म्य दाखवून मिमिक्री करून ही फुलपाखरे आपले भक्षकांपासून संरक्षण करतात. उदा plain tiger and danaid eggfly female.; Glassy tiger and common wandrer female.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

सो ऽ हमभाव आहे तरी काय ?

प्रवेश परीक्षा : आव्हाने आणि संधी!

राज्यस्तरीय डोंगरी साहित्य पुरस्कार जाहीर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading