- नवी दिल्ली येथे 5-6 नोव्हेंबर 2024 रोजी आशियाई बौद्ध शिखर परिषदेचे आयोजन
- परिषदेला राष्ट्रपती प्रमुख पाहुण्या म्हणून राहणार उपस्थित
नवी दिल्ली – भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय, आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्फेडरेशन (IBC) च्या सहकार्याने नवी दिल्ली येथे 5 ते 6 नोव्हेंबर 2024 रोजी पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद (ABS) आयोजित करत आहे. ‘आशिया खंडाच्या बळकटीकरणात बुद्ध धम्माची भूमिका’ ही या शिखर परिषदेची मुख्य संकल्पना आहे.
या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. शिखर परिषदेच्या माध्यमातून, संवादाला चालना देण्यासाठी, समजूतदारपणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बौद्ध समुदायाला भेडसावणाऱ्या समकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी आशिया खंडातील विविध बौद्ध परंपरेतील संघाचे नेते, विद्वान, तज्ञ आणि अभ्यासक एकत्र येतील,
आशियाई बौद्ध शिखर परिषदेत या विषयांचा समावेश :
1. बौद्ध कला, वास्तुकला आणि वारसा.
2. बौद्ध कारिका आणि बौद्ध धम्माचा प्रसार.
3. पवित्र बौद्ध अवशेषांची भूमिका आणि समाजातील त्याची प्रासंगिकता.
4. वैज्ञानिक संशोधन आणि कल्याणामध्ये बौद्ध धम्माचे महत्त्व.
5. 21 व्या शतकात बौद्ध साहित्य आणि तत्वज्ञानाची भूमिका.
या विषयांवरील चर्चेबरोबरच, आशियाला जोडणारा धम्म सेतू (पूल) – भारत या संकल्पनेवर आधारित एक विशेष प्रदर्शन आयोजित केले आहे; कार्यक्रमाच्या ठिकाणी इतर सृजनात्मक प्रदर्शनांसह इतर कार्यक्रमही आयोजित केले जाणार आहेत.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.