June 26, 2022
Packing Material From Cucumber Peel Kharagpur IIT research
Home » काकडीच्या सालीपासून पॅकेजिंग मटेरियल
नव संशोधन आणि तंत्रज्ञान शेती पर्यावरण ग्रामीण विकास

काकडीच्या सालीपासून पॅकेजिंग मटेरियल

काकडीपासून जवळपास 12 टक्के कचरा मिळतो. तो साल किंवा आतील गराच्या स्वरूपात असतो. यापासून सेल्युलोज, हेमीसेल्युलोज, पेक्‍टिन मिळवले जाते. याच्यापासून तंतूयुक्त जैविक मटेरियल तयार केले जाते. याचपासून विविध प्रक्रियेतून पॅकेजिंग मटेरिअल तयार केले जाते.
– प्रा. जईता मित्रा

खरगपूर आयआयटी

अन्न पदार्थांचे पॅकेजिंग करण्यासाठी मुख्यतः प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. आरोग्य आणि पर्यावरणासाठी धोकादायक असूनही प्लास्टिकचा वापर केला जातो. प्लास्टिकच्या वापरावर पर्याय शोधण्याचा प्रयत्न संशोधकांकडून केला जात आहे. आयआयटी खरगपूरमधील संशोधकांनी काकडीच्या सालीपासून अन्नपदार्थ पॅकेजिंगचे मटेरियल तयार केले आहे. त्यांच्या या संशोधनाने प्लास्टिकला पर्याय तर उपलब्ध होईलच; पण पर्यावरणाची हानीही रोखण्यास मदत होणार आहे.

फळांच्या साली आपण कचरा म्हणून नेहमीच टाकून देतो; पण या कचऱ्याचे अनेक उपयोग आहेत. यापासून खताचीही निर्मिती केली जाऊ शकते. उत्तम प्रकारचे खतही तयार होते. या टाकाऊ कचऱ्यापासून काही उपयुक्त गोष्टी तयार करण्याचा नेहमीच संशोधकांचा प्रयत्न राहिला आहे. खरगपूर आयआयटीमधील प्रा. जईता मित्रा व संशोधक विद्यार्थिनी एन. साई प्रसन्ना यांनी यावर संशोधन करून पर्याय शोधला आहे. खरगपूर आयआयटीमधील कृषी आणि अन्न इंजिनिअरिंग विभागामध्ये सहायक प्राध्यापक असणाऱ्या मित्रा यांनी प्रयोगासाठी काकडीच्या सालीचा वापर केला. त्यांनी सालीपासून सूक्ष्म काष्ठतंतूयुक्त कण (सेल्युलोज नॅनो क्रिस्टल्स) तयार करून त्यापासून पॅकेजिंग मटेरिअल तयार केले आहे.

कसे तयार केले जातात सेल्युलोज नॅनोक्रिस्टल्स ?

फळ आणि भाजीपाल्याच्या सालीपासून सेल्युलोज मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. या सेल्युलोजपासून बायो नॅनो फिलरच्या निरनिराळ्या भागाचा जाळीदार लगदा तयार केला जातो. या लगद्यापासून ऍसिड हायट्रोलायसीस प्रक्रियेतून सूक्ष्म काष्ठतंतूयुक्त कण तयार केले जातात. याचा उपयोग पॅकेजिंग मटेरिअल्स तयार करण्यासाठी केला जातो.
याबाबत अधिक माहिती देताना प्रा. मित्रा म्हणाल्या, काकडीपासून जवळपास 12 टक्के कचरा मिळतो. तो साल किंवा आतील गराच्या स्वरूपात असतो. यापासून सेल्युलोज, हेमीसेल्युलोज, पेक्‍टिन मिळवले जाते. याच्यापासून तंतूयुक्त जैविक मटेरियल तयार केले जाते. याचपासून विविध प्रक्रियेतून पॅकेजिंग मटेरिअल तयार केले जाते.

डॉ. मित्रा म्हणाल्या, “आमच्या अभ्यासानुसार हे मटेरिअल जैविक असल्याने त्याचे विघटन होऊ शकते. हे मटेरिअल स्वस्त आणि टिकाऊही आहे. याचे वजनही हलके आहे. तसेच प्लास्टिकच्या वापरावर हा पर्याय होऊ शकेल.’
संशोधक एन. साई प्रसन्ना म्हणाल्या, “74 टक्के स्फटिक स्वरूपात असणारे हे मटेरिअल उष्णता रोधकही आहे. 200 अंश सेल्सिअस तापमानातही ते टिकून राहू शकते. ऍसिड हायड्रोलायसिसमध्ये 65.55 टक्के मटेरिअल तयार होते.’

पॅकिंग मटेरिअलची वैशिष्ट्ये –

  • बिनविषारी, सहज विघटन होणारे, पूर्णता जैविक घटकापासून तयार केलेले असे हे मटेरिअल आहे.
  • आरोग्य आणि पर्यावरणास घातक नसणारे असे हे मटेरिअल आहे.
  • पूर्णता जैविक कचऱ्यापासून तयार केले जाते
  • औषधांच्या पॅकेजिंगमध्येही वापरता येणे शक्‍य.
  • या मटेरिअलचा पुनर्वापरही करता येणे शक्‍य.

Related posts

महाराष्ट्रातील कृषिविषयक उद्योगांसाठी 10 कोटी डॉलर्सचे कर्ज

Navratri Theme : जैवविविधतेची लाल छटा…

कोरफड अन् मेथीपासून घरीच बनवा हेअर पॅक

Leave a Comment