फळाच्या सालीकडे कचरा म्हणून न पाहता त्याचे उपयोग जाणून घेण्याची गरज आहे. या सालीपासून आपण उत्तम प्रकारचे घर स्वच्छ करणारे द्रव्य तयार करू शकतो. त्यासाठी काहीही खर्च नाही. अगदी घरच्या घरी बनवता येण्यासारखे आहे. ते कसे बनवायचे हे जाणून घ्या स्मिता पाटील यांच्याकडून…
हे द्रव्य आपण घरातील फरशीसाठी वापरू शकतो. घरात शुद्ध हवा करण्यासाठीही एअर प्युरिफायर म्हणूनही याचा उपयोग होऊ शकतो. इतकेच काय मोटारी स्वच्छ करण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो. फॅब्रीक साॅफ्टनर म्हणून, नैसर्गिक खत म्हणून, असे बरेच उपयोग आहेत.