नायक आता गाढ झोपी गेला... कवी : रोहित ठाकुर मराठी अनुवाद - भरत यादव घरासाठी सगळे लढतात सगळेच लढतात जमिनीकरिता डोंगरांसाठी कोण लढत असतं ? कोण वाचवतं झाडांना टोळक्यांपासून ? जेव्हा विस्मृती आड जाताहेत शेतं, डोंगरं आणि नद्या कोण हिंमत दाखवतं वृक्षांना मिठी मारतं सत्तरच्या दशकात एक आंदोलन जे माणसाच्या अस्मितेला जोडतं झाडांशी, पर्यावरणाशी हिमालयातून ठिणगीप्रमाणे पेटून उठतात महिला वाचवतात वृक्षवल्लींना वृक्षांना बिलगलेल्या महिला वृक्षांसह शोक करताहेत हिमालयात पायी चालणारा त्यांचा नायक आता गाढ झोपी गेला

Home » नायक आता गाढ झोपी गेला…
previous post
next post