बॉम्बे टु गोवा
व्हाया गुवाहाटी – सुरत
प्रवास लोकशाही-प्लस
हिंदूत्वाचा घडला होता..
महाविकासला
सुरूंग लावण्याचा
कट एका राती शिजला होता.
एकेका पुत्राचा स्वाभिमान
अचानक जागा झाला होता.
चौकशीचा ससेमिरा मागे
लागल्यावर जो तो मिळेल
त्या गाडीने धावला होता…
बॅगा लावून खांदा
जरा दुखला होता..
पन्नास कोटींच्या नोटांतील
बापू खुद्दकन हसला होता
दिवस सरला, पहाट सरल्या
प्लाल्यावर प्याला रिचला होता
मध्यान राती डीजेच्या
तालावर ‘एकनाथी
सुर रंगला होता
खुर्च्या, उशा, गाद्या उबवून उबवून
निष्ठेचा, तत्वांचा
धडा शिकवला होता
बंड, क्रांती , उठावाचा
बाजार इथे भरला होता
झाडी, डोंगर, बीच, समुद्राकाठी महाराष्ट्र लाज सोडून निजला होता