March 14, 2025
Dr. P. C. Shejwalkar Award
Home » प्रा. श्रीकृष्ण महाजन यांना डॉ. पी. सी. शेजवलकर पुरस्कार
काय चाललयं अवतीभवती

प्रा. श्रीकृष्ण महाजन यांना डॉ. पी. सी. शेजवलकर पुरस्कार

महाराष्ट्र कॉमर्स टीचर्स असोसिएशनकडून सन्मान

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांना त्यांच्या वाणिज्य व व्यवस्थापन शिक्षण व संशोधन क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र कॉमर्स टीचर्स असोसिएशनने त्यांना डॉ. पी. सी. शेजवलकर पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. लातूर येथे झालेल्या 35 व्या महाराष्ट्र  वाणिज्य परिषदेत असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवडे व डॉ. टि. ए. शिवारे यांच्या हस्ते प्रा. महाजन यांचा सन्मान करण्यात आला.

त्यांनी उच्च शिक्षण क्षेत्रात वाणिज्य व व्यवस्थापन विषयाचे जे अध्ययन, अध्यापन, संशोधन व विस्तारकार्य केले आहे त्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे. प्रा. महाजन यांच्या या सन्मानाबद्दल कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्रकुलगुरु डॉ. पी. एस. पाटील व कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

प्रा महाजन यांनी अकौंटन्सी व फायनान्स या विषयांचे २९ वर्षे अध्यापन केले आहे. तर अकौंटन्सी, फायनान्स, उद्योजकता विकास, काजू प्रक्रिया व अन्न प्रक्रिया उद्योग, ग्रामीण व्यवस्थापन या विषयांवर संशोधन केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद तसेच शिक्षण मंत्रालयाच्या इम्प्रेस या योजनेचे अनुदान त्यांच्या संशोधन प्रकल्पांना प्राप्त झाले होते. उद्योजकता विकास व वित्तीय समावेशन या विषयावर हे संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत. एकविस विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. पदवीचे संशोधन पूर्ण केले आहे.

सध्या ते विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहेत. विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी अकरा वर्षे असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. संशोधनामध्ये विभागाचा व विद्यापीठाचा नावलौकिक वाढविला आहे. वित्तीय व्यवस्थापन व अधिकोशीय अनुसंधान या विषयातील दि युनायटेड वेस्टर्न बँकेचे रा ना गोडबोले अध्यासनाचे प्राध्यापक, डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक तसेच विद्यापीठ अनुदान आयोग स्थापित सामाजिक समावेशक धोरण अभ्यास केंद्राचे संचालक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणीमुळे उच्च शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलांच्या संदर्भात त्यांनी महाराष्ट्रभर अनेक व्याख्याने दिली आहेत. तसेच त्याअनुषंगाने विद्यापीठीय धोरण निर्मितीमध्येहि त्यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे. अकौंटन्सी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यासाठी आग्रहपूर्वक प्रयत्न केले. कुलगुरू व प्रकुलगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली एम. बी. ए. ऑनलाइन, बी. कॉम. (बी. एफ. एस. आय.) व बी. बी. ए. एम. बी. ए. इंटिग्रेटेड असे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

75 व्या अखिल भारतीय वाणिज्य परिषदेमध्ये त्यांना इंडियन कॉमर्स असोसिएशन कडून फेलो म्हणून सन्मानित करण्यात आलेले आहे तसेच शिवाजी विद्यापीठाने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविले आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading