October 16, 2024
Pushpa Varkedkar article on Morning meditation
Home » Privacy Policy » प्रभाती सूरमनी रंगती
मुक्त संवाद

प्रभाती सूरमनी रंगती

निसर्गचक्रापैकी पहिला टप्पा म्हणजे प्रभात, सकाळ यालाच अमृतवेला, सुवर्णवेला असे म्हटले जाते.
“लवकर नीजे, लवकर उठे
त्याची सदा आरोग्य लाभे”
या म्हणीनुसार व्यक्तिमत्व विकासाकरता, आरोग्य सुदृढ राहण्याकरिता, मनःशांती करिता मंगलवेळा आपली आतुरतेने वाट बघते व आपले सुंदर स्वागत करण्यास सज्ज असते. वातावरणात भरपूर प्रमाणात प्राणवायू असतो. या प्रभाती भक्तगण घराघरात, मंदिरात नामस्मरण आराधना करून मनःशांती लाभण्याकरिता उपासना करतात.

योगीजन योग साधतात, विद्यार्थी आपल्या जीवनाचा मार्ग यशस्वी करण्याकरिता अध्ययन करतात. आरोग्यदायी प्रभात ही परमेश्वराची अमूल्य देणगी होय. परमेश्वराने आपल्याला बहाल केली आहे. या अमूल्य क्षणाचा आनंद दिवसभर टिकून राहतो. मन आनंदाने भरून जाते, कल्पनाशक्ती जागृत करते. इहलोकीचे सौख्य व पारलौकिक सौख्य प्रदान करून देणारी आहे. हा निसर्गाचा मंगलमय सोहळा बघण्याचे भाग्य सर्वांना लाभो.

संतांनी म्हटलेले आहे
“उठा जागे व्हा रे आता
स्मरण करा पंढरीनाथा”
या मंगल प्रभाती दैवी शक्तीचा संचार देखील होत असतो. प्राणवायूचा भरभरून साठा आसमंतात. आळस झटकून त्या मंगलमय प्रभातीचे सर्वांनी स्वागत करावे. व्यक्तिगत प्रगती करण्याकरिता आरोग्याची उपासना करण्याकरिता भगवंताने आपल्याला अष्टौव प्रहरा पैकी सकाळचा प्रहर प्रदान केलेला आहे.
विशेषतः स्त्रियांना संसारीक जबाबदाऱ्या पेलताना स्वतःकडे, स्व आरोग्याकडे, विकासाकडे लक्ष देण्याला वेळच नसतो.

तर या अमृत वेळेचा जरूर आमच्या भगिनींनी लाभ घ्यावा असे मला वाटते या उषेचे सौंदर्य काही अप्रतिमच आहे. या पहाटेचे स्वागत करण्याकरिता हा भास्कर आपल्या सहस्त्र किरणांनी आपले बाहू पसरून सोनेरी किरणांनी सज्ज असतो. या भास्कराचे आगमन होत असताना हा नजारा, हे सौंदर्य आपण न्याहाळावे . दिवस निघाल्याबरोबर आपण सांसारिक चक्रामध्ये रममाण होतो. परंतु सकाळचे सौंदर्य न्याहाळण्याचे भाग्य आपणा सर्वांना लाभो. आपण या सुवर्ण क्षणांना मुकता कामा नये.

म्हणूनच कवीने म्हटलेले आहे..
“प्रभाती सूरमणी रंगती
दशदिशा भूपाळी म्हणती”.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading