- मातोश्री रत्नमाला बबन पिसाळ स्मृती पुरस्कारसाठी कथासंग्रह, ललित साहित्यकृती पाठवा
- 1 जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत प्रकाशित झालेली साहित्यकृती हवी
- रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप
- 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत साहित्यकृती पाठवावी
सोलापूर – वडशिवणे, ता. करमाळा येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा मातोश्री रत्नमाला बबन पिसाळ स्मृती पुरस्कार कथासंग्रह, ललित साहित्यकृतीस देण्यात येणार आहे. दत्तात्रय पिसाळ यांच्यावतीने हा पुरस्कार देण्यात येतो, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ टकले यांनी दिली. यावेळी प्रा. बाबुराव इंगळे, दिनेश आदलिंगे, डॉ. जनार्दन भोसले, दत्तात्रय पिसाळ हे उपस्थित होते.
पुरस्कारे हे तिसरे वर्ष असून या वर्षासाठी 1 जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत प्रकाशित झालेले कथासंग्रह, ललित साहित्यकृती मागवण्यात आले आहे. तरी साहित्यिकांनी प्रकाशित पुस्तकाच्या दोन प्रती, अल्प परिचय, छायाचित्र 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत पाठवावेत. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून यापूर्वी आबासाहेब पाटील, राजेंद्र भाग्यवंत, नागु वीरकर, मानसी चिटणीस या साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले आहे.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
दत्तात्रय बबन पिसाळ, लॅनसेक्स इंडिया प्रा लिमिटेड,
अवश्या सी सी आय लॉजिस्टिक पार्क डॉक क्रमांक 60,
सर्व्ह क्रमांक.123, जुना मुंबई पुणे महामार्ग, पळस्पे फाटा,
कोळखेगाव, पनवेल 410206
अधिक माहितीसाठी संपर्क ९०९६७९९९०६
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.