February 22, 2024
The son of Krishnakath who lends a helping hand in times of crisis
Home » संकटात मदतीचा हात देणारा कृष्णाकाठचा सुपुत्र
सत्ता संघर्ष

संकटात मदतीचा हात देणारा कृष्णाकाठचा सुपुत्र

आजच्या घडीला महाराष्ट्रातील एक धडाडीचे नेतृत्व म्हणून आदरणीय विश्वजित कदम यांचे नाव आहे. त्यांच्या एकुण कामाचा आवाका आणि त्यांच्या समाजकारणातील अनमोल कार्याची चर्चा नेहमीच आपणास ऐकावयास मिळते. भारत हा युवकांचा देश आहे. महाराष्ट्र हे एक महत्त्वाचे विकसित राज्य आहे. अशा पार्श्वभूमीवर युवकांचे धडाडीचे नेतृत्व म्हणून आज राज्य आणि पर्यायाने देश विश्वजित कदम यांच्या कडे बघत आहे. युवकांच्या मनातील नेता नेमका कसा असावा याचे एक उदाहरण म्हणून त्यांच्या कार्याकडे आपणास सहजपणे दृष्टीक्षेप टाकता येईल. त्यातून त्यांच्या मनातील तळमळ दिसून येईल. गोरगरीबाचे कल्याण व्हावे यासाठी झटणारी माणसं दुर्मिळ होत चालली आहेत. त्यात आशेचा किरण म्हणून, अंधार दूर करणारा प्रकाश म्हणून त्यांचे नाव समोर येते. बाळासाहेब हे त्यांच जनसामान्यांच्या मुखातील लोकप्रिय नाव.

कृष्णाकाठची कृष्णा नदी जेव्हा महापुराच्या रूपात गावात आली तेव्हा सर्वसामान्य लोक घाबरून गेले. अशावेळी डॉ. विश्वजित कदम यांनी लोकांना धीर दिला. ते स्वतः महापुरात होडीतून हिंडत राहिले. लोकांना मदत करत राहिले. हे चित्र फारच कोरीव झाले आहे. आजही डोळ्यात ते चित्र ठळकपणे बसले आहे. निसर्गाचे संकट सांगून येत नाही. वैद्यकीय संकट सांगून येत नाही. अचानकपणे येतं. पण बाळासाहेब या दोन्ही संकटाशी लोक भिडत असताना सोबत उभे राहिले. जागतिक स्तरावर आलेलं कोरोना सारखं संकट साहेबांनी मोठ्या ताकदीने झेललं. लोकांना मदत करणारा माणूस अक्षरशः देवमाणूसच असतो. त्यामुळे त्यांच्या विषयी आदर वाढत राहतो. असा नेता आपल्या मातीला लाभला याबद्दल आनंद वाटत राहतो.

बाळासाहेबांना साहित्याची आवड आहे. विचार भारती सारखे साहित्याला वाहिलेले उत्तम मासिक त्यांनी उभे केले आहे. यामुळे लिहत्या हातांना हक्काची जागा मिळाली आहे. व्यक्त होण्याचं मोलं समजणारा आणि व्यक्त होण्यासाठी जागा निर्माण करणारा असा नेता दुर्मिळ आहे. दरवर्षी हे मासिक लाखो लोकांपर्यंत पोचते. त्यातून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मदत होते आहे. मायमराठी साठी, आपल्या मातृभाषेसाठी, मराठी साहित्यासाठी हे खूप महत्त्वाचे कार्य होत आहे. समाजाला वैचारिक दृष्टिकोन देण्यासाठी असे कार्य होत राहणे गरजेचे आहे.

बाळासाहेबांचे समाजकारण हे नेहमीच लोककल्याणकारी राहिलेले आहे. त्यांची विचारधारा नेहमीच प्रगतीशील राहिलेली आहे. महाराष्ट्राच्या भूमीतील महामानवाचे वैचारिक वारसदार म्हणून त्यांच्या कडे बघता येईल. गोर गरीब जनतेला त्यांच्या कडून अपेक्षा वाटत आलेल्या आहेत. वेळोवेळी एक सक्षम युवा नेतृत्व म्हणून ते या अपेक्षा पूर्ण सुध्दा करत आलेले आहेत. लोकांच्या भूकेचा प्रश्न सोडविण्यासाठी झटत राहणं. त्यांच्या ताटात हक्काची भाकरी येण्यासाठी झटत राहणं. सर्वसामान्यांच्या संकटात उभं राहणं. या ठळक गोष्टी बाळासाहेबांच्या प्रतिमेला बळकटी आणतात. बाळासाहेब जवळचे वाटतात याला कारण ते वेगळे ठरतात म्हणून. त्यांचं हे वेगळेपण त्यांची एक ठळक ओळख झाली आहे.

अनेक गरजू लोकांना विशेषतः युवा वर्गाला पोटापाण्याला लावण्यासाठी ते कार्य करत आले आहेत. माझं उदाहरण द्यायचे झाल्यास, माझ्या गरीब परिस्थितीची आणि माझ्या कादंबरी लिखाणाची दखल घेऊन त्यांनी मला भारती विद्यापीठात नोकरी दिली. अशा प्रकारे त्यांनी हजारो अनेक कुटुंबे उभी केली आहेत. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Related posts

पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे साहित्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ताई

द्राक्षवेलीवरील घड जिरण्याच्या समस्येवरील उपाय

हर हर महादेव…वाळू शिल्प व्हिडिओ

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More