April 23, 2024
shabdagandh-literature-award-nagar
Home » शब्दगंधचे साहित्य पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

शब्दगंधचे साहित्य पुरस्कार जाहीर

२०२२ चे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहिर अंतस्थ हुंकार, बेवारस, हंगामी, क्रांती उद्यानाचे तपस्वी, काजवा , साहित्य आणि लोककला : मार्क्स, आंबेडकरी दिशा होरपळ, स्ट्रगलर, चा समावेश

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने २०२२ चे “ राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार ” अंतस्थ हुंकार, बेवारस, हंगामी , क्रांती उद्यानाचे तपस्वी , काजवा, साहित्य आणि लोककला: मार्क्स, आंबेडकरी दिशा,प्रिय हा कण गॉड पार्टिकल या पुस्तकांना जाहिर करण्यात येत असून पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.

पुरोगामी विचारांच्या व विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन असणाऱ्या शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदित लेखक, कवींना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यासाठी वर्षभर विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये कथाकथन, काव्यवाचन, परिसंवाद, चर्चासत्र, कथा-काव्य लेखन स्पर्धा, विविध पुरस्कार वितरण, पुस्तक प्रकाशन, बालसंस्कार शिबीर ई उपक्रम राबविण्यात येतात. त्यानंतर वर्षातून एकदा सर्व सभासदांना एकत्र भेटता यावे यासाठी राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून राज्यस्तरीय वाड्मय स्पर्धा आयोजित करण्यात येतात.

अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कवयित्री शर्मिला गोसावी, प्राचार्य विलास साठे, भगवान राऊत, सुनील धस, स्वाती ठुबे, प्रा.डॉ. तुकाराम गोंदकर, बाळासाहेब शेंदूरकर यांची उपस्थिती होती.

२०२२ चे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार

काव्यसंग्रह
अंतस्थ हुंकार – डॉ. शिवाजी शिंदे, सोलापूर,
प्रिय हा कण गॉड पार्टिकल आहे – आशा डांगे, संभाजीनगर,

वैचारिक ग्रंथ
साहित्य आणि लोककला: मार्क्स, आंबेडकरी दिशा – डॉ. मिलिंद कसबे, नारायणगाव

कादंबरी
बेवारस – धनंजय पोटे, चंद्रपूर

कथासंग्रह
हंगामी – विलास पंचभाई, नाशिक,

लेखसंग्रह
क्रांती उद्याचे तपस्वी – प्रा.वसंत गिरी, मेहकर

आत्मचरित्र
काजवा – पोपटराव काळे, पुणे (नाटक)
डिकाष्टा – डॉ. अनंत कडेठाणकर, संभाजीनगर

बाल कथासंग्रह
वेणुच्या गोष्टी – विनोद गायकर, मुंबई

बाल काव्यसंग्रह
गम्माडी झिम्माडी – स्मिता बनकर, नाशिक

२०२२ चे जिल्हास्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार

कादंबरी
होरपळ – गिताराम नरवडे, टाकळी खादगाव

काव्यसंग्रह
रंग आयुष्याचे – स्वाती पुरी, अकोले,

आत्मचरित्र
मी गुरुजी झालो त्याची गोष्ट – राजेंद्र भाग्यवंत, अकोले,

समीक्षा ग्रंथ
मराठी ग्रामीण आई स्वरूप आणि शोध – डॉ. योगिता रांधवणे, सावेडी

व्यंगचित्र
सासू Vs सुन, अरविंद गाडेकर, संगमनेर,

लेखसंग्रह
स्ट्रगलर – आशिष निनगुरकर, मुंबई

परीक्षक म्हणून शर्मिला गोसावी, हरिभाऊ नजन, डॉ.अनिल पानखडे, बबनराव गिरी, सुभाष सोनवणे यांनी काम पाहीले. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल, बुके व साहित्य संमेलनात सहभाग असे पुरस्काराचे स्वरूप असून पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार वितरण होणार आहे.

Related posts

शेवगा (ओळख औषधी वनस्पतीची)

डॉ. इस्माईल पठाण यांच्या नजरेतून शिवरायांची धर्मनीती

अग्रणी उत्कृष्ठ साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

Leave a Comment