पर्यावरणविषयक शॉर्टफिल्म, डॉक्युमेन्ट्रीच्या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठात येत्या 2 आणि 3 जानेवारी 2026 रोजी स्पार्क फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने विद्यापीठात पर्यावरण विषयक शॉर्टफिल्म आणि डॉक्युमेन्ट्रीच्या राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहेत. ही स्पर्धा मास कम्युनिकेशन विभागात होईल.
शिवाजी विद्यापीठाचा बी. ए. फिल्म मेकिंग विभाग, लक्ष्मी फाऊंडेशन आणि किर्लोस्कर ऑईल इंजिन यांच्यावतीने या फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. स्पर्धकांनी पर्यावरण विषयावर 20 मिनिटांपर्यंत शॉर्टफिल्म किंवा डॉक्युमेन्ट्री सादर करायची आहे. 25 डिसेंबरपर्यंत मास कम्युनिकेशनच्या मेलवर स्पर्धकांना कलाकृती जमा करता येणार आहे.
स्पर्धेत प्रथम क्रमांकाला 15 हजार, द्वितीय क्रमांकाला 10 तर तृतीय क्रमांकाला 7 हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. सर्व स्पर्धकांना विद्यापीठाचे सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेत बक्षिस मिळविणार्या पहिल्या तीन कलाकृतींचे वसुंधरा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन बी. ए. फिल्म मेकिंग विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
