April 30, 2024
Ten days of unseasonal rain in Maharashtra
Home » महाराष्ट्रात दहा दिवस अवकाळी पावसाचे वातावरण
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्रात दहा दिवस अवकाळी पावसाचे वातावरण

            १- अवकाळीचे वातावरण-

             मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात आजपासून (१६ ते २५ एप्रिल ) दहा दिवस ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी भाग बदलत किरकोळ अवकाळी ( गडगडाट, वीजा, वारा) पावसाची शक्यता जाणवते.
             मुंबईसह कोकणात मात्र आजपासून केवळ (१६,१७,१८एप्रिल ) तीन दिवस अवकाळी वातावरणाची शक्यता जाणवते.

            २- उष्णतेची लाट-

             मुंबईसह उत्तर कोकणातील पालघर ठाणे जिल्ह्यात आज, उद्या व परवा म्हणजे मंगळवार ते गुरुवार (१६-१८ एप्रिल) रोजी तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवते.
           

             ३-रात्रीचा उकाडा-

             मध्य महाराष्ट्रातील  खान्देश, नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अश्या १० जिल्ह्यात आज, उद्या व परवा म्हणजे मंगळवार ते गुरुवार (१६ ते १८ एप्रिल) रोजी दिवसा चांगलीच उष्णतेची काहिली तर रात्री उकाडा जाणवू शकतो.

             ४- किनारपट्टीवरील दमटयुक्त उष्णता-

              मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात तसेच लगतच्या गोवा व गुजराथ राज्यात आज, उद्या व परवा म्हणजे मंगळवार ते गुरुवार (१६-१८ एप्रिल) रोजी दिवसा दमटयुक्त उष्णतेचा अनुभव येईल.

माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ

Related posts

वडणगेच्या तालमीं आणि पैलवानकी…

शेतकऱ्याचे मारेकरी कोण ?

पपई फळपिकामधील कार्यक्षम अन्नद्रव्ये नियोजन

Leave a Comment